राज्य नेतृत्वाने चुकीचे उमेदवार निवडल्यानेच केरळमध्ये २०११ च्या विधानसभा निवडणुकीत डाव्या आघाडीचा पराभव झाल्याचा ठपका मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व्ही. एस. अच्युतानंदन यांनी ठेवला आहे. विशेष म्हणजे केरळ माकपवर अच्युतानंदन यांचे पक्षांतर्गत विरोधक मानले जाणारे पिनरी विजयन यांचे वर्चस्व आहे. त्यांच्यावरही ही टीका मानली जाते. तसेच पक्षातील एका गटाला आपल्या नेतृत्वात सत्तेत पुन्हा येऊ नये असे वाटल्याचे अच्युतानंदन यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले.