केंद्र सरकार विरुद्ध पश्चिम बंगाल सरकार हा वाद दिवसेंदिवस शिगेला पोहोचत चालला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. लशींच्या तुटवड्यावरुन त्यांनी केंद्र सरकारला चांगलंच सुनावलं आहे. राज्यांना लस उपलब्ध होत नसताना संपूर्ण देशाचं डिसेंबरपर्यंत लसीकरण कसं करणार?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच केंद्र सरकारने सर्व राज्यांना मोफत लस दिली पाहीजे असंही सांगितलं.

“केंद्र सरकार खूप काही सांगते. पण तसं होत नाही. वचनबद्धता असली पाहीजे. लस संपूर्ण देशाला पुरवणं मोठं काम आहे. राज्यांना लस पुरवू शकत नाहीत. तर डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशाचं लसीकरण कसं करणार?”, असा प्रश्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला. लसीकरणाबाबत ओडिशा आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारने सर्व राज्यांना मोफत लस दिली पाहीजे असं सर्वांचं म्हणणं आहे.

अल्पन बंडोपाध्याय मुद्द्यावरून गेल्या काही दिवसात केंद्र सरकार आणि ममता बॅनर्जी यांच्यात वाद वाढला आहे. “हे प्रकरण आता संपलं आहे. यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही”, असं सांगत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उपरोधिक उत्तर दिलं.

Coronavirus: “अमेरिका आणि युरोपपेक्षा उत्तर प्रदेशमध्ये मृत्यूदर कमी”; योगींनी थोपटली स्वत:चीच पाठ

देशातल्या लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या २१ कोटी ८५ लाख ४६ हजार ६६७ झाली आहे. तर महाराष्ट्रात आत्तापर्यंत लस घेतलेल्या नागरिकांची संख्या दोन कोटी २८ लाख ३२ हजार ७४३ झाली आहे. त्यापैकी एक कोटी ८२ लाख १६ हजार ५०३ लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला तर ४६ लाख १६ हजार २४० लाभार्थ्यांनी करोना प्रतिबंधक लसींचा दुसरा डोस घेतला.

Story img Loader