Vadodara Car Accident Latest News Update : गुजरातच्या वडोदरा येथे एका २० वर्षीय तरूणाने त्याच्या भरधाव कारने एका स्कूररला दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या दुर्घटनेच्या तीन दिवसानंतर या हा अपघात घडण्यापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये या प्रकरणातील आरोपी रक्षित चौरसिया आणि अपघातावेळी त्याच्याबरोबर कारमध्ये असलेला त्याचा मित्र हे त्यांच्या दुसऱ्या मित्राच्या घरी असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच फुटेजमध्ये अपघात झालेली कार देखील दिसून येत आहे.

सीसीटीव्हीमध्ये काय समोर आलं?

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे की, आरोपी रक्षित हा सुरेश भारवाड यांच्या घरी स्कूटरवरून आला आणि काही वेळ तिथेच थांबला. थोड्या वेळाने प्रांशू चौहान त्यांच्या कारने तेथे पोहोचला. मीडिया रिपोर्टनुसार, सुमारे ४५ मिनिटांनंतर प्रांशू आणि रक्षित एकत्र निघून गेले.

सुरूवातीला प्रांशू हा चालकाच्या सीटवर बसला होता, मात्र रक्षितने गाडी स्वतः चालवण्याचा आग्रह केला आणि त्याला बाजूला बसयाला भाग पाडले. समोर आलेल्या एका व्हिडीओत रक्षित आणि त्याचा मित्र स्कूटरवरून मित्राच्या घरी पोहचल्याचे दिसत आहे. घरात प्रवेश करण्याआधी ते एकमेकांशी बोलताना दिसत आहेत, यावेळी रक्षितच्या हातात बाटली दिसत आहे. टाईम्स नाऊने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या रक्षितने आपण अपघातावेळी दारू घेतली नव्हती असा दावा केला आहे. तसेच त्याने दावा केला की तो ५० किमी प्रतितास वेगाने गाडी चालवत होता.

चौरसिया याने आपण दारूच्या नशेत गाडी चालवत नव्हतो असा दावा केला असला थरी घटनास्थळी त्याला पकडलेल्या प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले की, तो दारू पिऊन गाडी चालवत होता. तसेच पोलिस अभिचार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर गाडीतून बाहेर पडल्यानंतर तो “आणखी एक राऊंड, आणखी एक राऊंड” असे ओरडत होता. त्याचे असे ओरडतानाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Story img Loader