एक बॉस त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी महिलेची खिल्ली उडवायचा. तसंच तिच्या हातून काही चूक झाली तर सगळ्यांच्या देखत तिला रागवायाचा. या दोन्ही गोष्टींचा राग मनात ठेवून महिलेने नोकरी सोडली पण तिने बॉसचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या महिलेने असा बदला घेतला की बॉसला तिने जन्माची अद्दलच घडवली. गुजरातमधल्या बडोदा या ठिकाणी ही घटना घडली आहे.

सोशल मीडियाद्वारे केली जवळीक आणि मग..

या महिलेने नोकरी सोडल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉसला हनी ट्रॅपमध्ये फसवलं आणि त्याला नरकयातना दिल्या. त्यासाठी तिला दोन माजी कर्मचाऱ्यांनीही मदत केली. या तिघांनी मिळून बॉसला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा कट आखला. या कटानुसार त्यांनी बॉसला तीन महिन्यात एका पाठोपाठ एक झटके दिले. शेवटी त्याने पोलिसांशी संपर्क केला.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…

बॉसला हनी ट्रॅपमध्ये फसवलं आणि नग्न फोटो केले व्हायरल

ज्या महिलेला बॉस त्रास देत होता. तिने त्याचा बदला घेण्यासाठी सगळ्या सीमा ओलांडल्या. त्याला हनीट्रॅपमध्ये जेव्हा फसवण्यात आलं तेव्हा या बॉसने त्याचे नग्न फोटो या महिलेला पाठवले. हे फोटो हाती येताच या महिलेने बॉसच्या पत्नीला, त्याच्या जवळच्या नातेवाईकांना एवढंच नाही तर कंपनीच्या एचआरलाही हे फोटो पाठवले. बॉसने माझा कायमच अपमान केला आणि खिल्ली उडवली म्हणून मी हे सगळं केलं असं या महिलेने म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

पीडित बॉसने सायबर क्राईम शाखेशी केला संपर्क

नोकरी सोडल्यानंतर प्रीती आणि अनिश या दोघांनी (दोन्ही नावं काल्पनिक आहेत.) हातमिळवणी केली. कारण या दोघांनाही त्यांच्या बॉसचा बदला घ्यायचा होता. या प्रकरणात या दोघांचा बॉस समीर गुप्ता (बदललेलं नाव) याने सायबर क्राइमशी संपर्क केला. त्यानंतर पोलिसांनी प्रीती आणि अनिश या दोघांचा छडा लावला. मी माझ्या बॉसला नरकयातना देणार हे ठरवलंच होतं त्यामुळेच मी तसं केलं असं प्रीतीने पोलिसांना सांगितलं आहे. तिने आणि अनिशने फेक इंस्टाग्राम आयडी तयार केला.त्यानंतर बॉसशी चॅटिंग करायला सुरुवात केली.

प्रितीने त्या बनावट अकाऊंवरुन तिच्या बॉसला काही अश्लील मेसेजही पाठवले. समीर गुप्ताला वाटलं की त्याच्याशी कुणीतरी महिलाच चॅटिंग करते आहे. त्यानंतर प्रीतीने तिच्या बॉसकडे नग्न फोटोंची मागणी केली. ज्या जाळ्यात तो अडकला आणि त्याने तिला फोटो पाठवले. ज्यानंतर प्रीतीने ते सगळीकडे व्हायरल केले. पोलिसांनी या प्रकरणात दोघांनाही ताब्यात घेतलं आहे आणि या दोघांवर कारवाई सुरु केली आहे.

Story img Loader