Vaishno Devi Yatra Jammu Kashmir Landslide : वैष्णो देवी यात्रेच्या मार्गावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. पदयात्रा जिथून जाते त्या भागात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत दोन यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. एक भाविक जखमी असून काही यात्रेकरू अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर प्रशासनाने मदत व बचावकार्य हाती घेतलं आहे. जेणेकरून परिस्थिती नियंत्रणात आणता येईल. तसेच यात्रेकरुंचा मार्ग मोकळा होईल. दरम्यान, जखमी झालेल्या यात्रेकरुवर प्राथमिक उपचार करून त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, प्रशासनाने यात्रेकरुंना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. तसेच सर्वत्र लक्ष ठेवून मार्गक्रमण करण्यास सांगितलं आहे. भूस्खलनानंतर यात्रेचा मार्ग बंद आहे. लवकरच मलबा हटवून वाट मोकळी करून दिली जाईल असंही प्रशासनाने सांगितलं आहे. श्री माता वैष्णो श्राईन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, सकाळपासून पदयात्रेच्या मार्गावर दगड व माती ढासळत आहे. आमचं बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं असून त्यांनी यात्रेकरूंची मदत करण्यास सुरुवात केली आहे. दुपारी २.३५ वाजता मंदिरापासून तीन किमी तूर पंच्छी भागात भूस्खलन झाल्याचं त्यांनी सांगितलं. या दुर्घटनेनंतर वैष्णोदेवी यात्रेच्या जुन्या मार्गावरून भाविक मंदिराच्या दिशेने चालू लागले आहेत.

हे ही वाचा >> Pawan Khera : “सेबीच्या प्रमुख असूनही ICICI बँकेकडून माधबी पुरींनी १६ कोटी पगार घेतला आणि..”; काँग्रेसच्या पवन खेरांचा आरोप

जम्मू काश्मीरच्या अखनूर भागात मे २०२४ मध्ये एक मोठी दुर्घटना झाली होती. त्यावेळी पदयात्रेच्या मार्गावर दरड कोसळून २२ यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. तसेच ५४ जण जखमी झाले होते.

हे ही वाचा >> Supreme Court : “आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवणे कायद्याविरोधात”, सर्वोच्च न्यायालयाचे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान सरकारवर ताशेरे

देशातील सर्वात लोकप्रिय तीर्थक्षेत्र

वैष्णो देवी हे दुर्गामातेचं मंदिर आहे. जे आदीशक्तीच्या १०८ शक्तीपीठांपैकी एक आहे. तसेच वैष्णो देवी मंदिर हे देशातील सर्वात लोकप्रिय तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक वैष्णो देवीच्या दर्शनासाठी जातात. वैष्णो देवी यात्रेचा राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे. दर वर्षी लाखोंच्या संख्येने देशभरातून व परदेशातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. प्रामुख्याने नवरात्रोत्सवात येथे मोठी गर्दी उसळते. पावसाळ्यात मंदिराकडे जाण्याचा मार्ग अधिक खडतर होतो, अनेक निसरड्या वाटा पार करणं अधिक अवघड होतं. दरड कोसळण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे पावसाळ्यात येते भाविकांचा ओघ कमी असतो.