भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी हे उत्तम पंतप्रधान होते, महिलांना आरक्षण देण्याची आपली मागणी त्यांनी स्वीकारली. तथापि, पक्षातील काही विघ्नसंतोषी नेत्यांनी वाजपेयी यांना नीट कारभार करू दिला नाही, असे सपाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी म्हटले आहे.
महिला आरक्षणाला सपाचा विरोध नव्हता, मात्र ते पक्षीय पातळीवर असले पाहिजे, उमेदवारी देताना पक्षाने १५ ते २० टक्के महिला उमेदवारांना संधी द्यावी, तुम्ही तसे केले नाही तर पक्षाची नोंदणी रद्द झाली पाहिजे, असे मुलायमसिंह म्हणाले.
महिलांसाठी १५ ते २० टक्के आरक्षण निश्चित केले असते तर पक्षांनी नोंदणी रद्द होण्याच्या भीतीपोटी महिलांना आणखी दोन टक्के उमेदवारी दिली असती. वाजपेयी यांनी आपल्याला पाचारण करून आपले मत त्याबद्दल जाणून घेतले होते. तुमची मागणी मान्य करता येण्यासारखी आहे, मात्र २५ टक्के आरक्षण अधिक आहे, असे अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते. तेव्हा आपण त्यांना १५ टक्के आरक्षण देण्याची सूचना केली होती. तथापि, भाजपमधील वाजपेयी यांच्या विरोधकांनी याबाबत त्यांना निर्णय घेऊ दिला नाही, असेही मुलायमसिंह म्हणाले.

Story img Loader