बांग्लादेशमध्ये पुन्हा एकदा मंदिरात तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तींनी पश्चिम बांग्लादेशातील एका मंदिरात तोडफोड आणि देवीच्या मूर्तीची विटंबना केली आहे. पोलीस या व्यक्तींचा शोध घेत आहेत.

बांग्लादेशातील झेनाइदह जिल्ह्यातील दौतिया गावातील कालीमाता मंदिराच्या अधिकाऱ्यांना मंदिरात मूर्तीचे काही तुकडे दिसले आणि मंदिरापासून काही अंतरावर मूर्तीचा काही भाग आढळला.अशी माहिती bdnews24.com या न्यूज पोर्टलला मंदिर समितीचे अध्यक्ष सुकुमार कुंदा यांनी दिली असल्याचे एएनआय वृत्तसंस्थेने सांगितले आहे.

हे कालीमाता मंदिर हिंदूंचे श्रद्धास्थान आहे आणि या ठिकाणी नियमीत पूजा होत असते. अशी माहिती देखील सुकुमार कुंदा यांनी दिली आहे.

बांग्लादेशमध्ये दहा दिवसीय नवरात्रोत्सव संपला, दसऱ्याच्या दिवशी अनेक ठिकाणी नदी घाटांवर देवीच्या मूर्तींचे विसर्जनही झाले. यानंतर ही घटना आता समोर आली आहे. या अगोदरही याचवर्षी १७ मार्च रोजी बांग्लादेशमध्ये इस्कॉन मंदिरात तोडफोड झाल्याची घटना घडलेली आहे.

या घटनेप्रकरणी पोलिसांना अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवला असून, मूर्तीची तोडफोड करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. मागील वर्षी नवरात्रोत्सव काळत बांग्लादेशमध्ये हिंसाचाराची घटना घडली होती.

Story img Loader