पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर १ ऑक्टोबरपासून वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. मात्र, पहिल्या महिन्याभरातच तीन वेळा या एक्स्प्रेसला छोटे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रत्येकवेळी समोर आलेल्या जनावरांना धडक दिल्याने वंदे भारत एक्स्प्रेसचं नुकसान झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आज सकाळच्या सुमारास तिसऱ्यावा या एक्स्प्रेसला तशाच स्वरुपाचा अपघात झाल्याचं समोर आलं आहे.

गुजरातमध्ये घडली घटना

गुजरातमध्ये सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात झाल्यामुळे तिच्या पुढच्या भागाचं नुकसान झालं. वलसाडच्या अतुल रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला, एक गाय अचानक रेल्वेच्या समोर आल्यामुळे ही धडक झाली. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकारानंतर जवळपास अर्धा तास वंदे भारत एक्स्प्रेस अतुल रेल्वे स्थानकावर उभी ठेवण्यात आली होती. या अपघातामध्ये रेल्वेच्या कपलरच्या कव्हरचंही नुकसान झालं असून बीसीयू कव्हरचंही नुकसान झाल्याचं सांगितलं दात आहे. याशिवाय, रेल्वेमध्ये पाणीपुरवठा करणारा पाण्याचा पाईपदेखील नादुरुस्त झाला. या अपघातामध्ये प्रवाशांना कोणतंही नुकसान झालं नाही.

truck driver lost control crashing into parked container on Mumbra Bypass Road
मुंब्रा बायपासवर अपघात चालक जखमी
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : चालकाने क्लचऐवजी ॲक्सिलेटर दाबला? कुर्ला दुर्घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर!
Kurla Best bus accident, Sanjay More ,
Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला अटक
Mumbai Bus Accident
Mumbai Bus Accident : मुंबईत बेस्टच्या बसची अनेकांना धडक, ३ ठार, १७ गंभीर जखमी
pune two wheeler accident marathi news
पुणे : सातारा रस्त्यावर बीआरटी मार्गात दुचाकींची समोरासमोर धडक, दोघे जण जखमी
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय
container ran into food court, Khalapur,
खालापूर जवळ नियंत्रण सुटल्याने कंटेनर फुड कोर्टमध्ये घुसला; एकाचा मृत्यू, तीन वाहनांचे नुकसान

महिन्याभरात तिसरी घटना!

दरम्यान, गेल्या महिन्याभरात वंदे भारत एक्स्प्रेसला अशा प्रकारे अपघात होण्याची ही तिसरी घटना ठरली आहे. पंतप्रधानांनी उद्धाटन केल्यानंतर सहाव्याच दिवशी अहमदाबादच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची वटवा आणि मणिनगर रेल्वेस्थानकादरम्यान काही म्हशींना धडक बली होती. त्यावेळीही रेल्वेच्या पुढच्या भागाचं नुकसान झालं होतं. या अपघातात चार म्हशींचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी लगेचच वडोदरा भागातील आनंद परिसरात पुन्हा या एक्स्प्रेसची एका गायीला धडक बसल्याची घटना घडली होती.

Story img Loader