Vande Bharat sleeper Train Video : वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या काही चाचण्या घेण्यात आल्या, ज्यामध्ये या रेल्वेने १८० प्रतितास वेग गाठण्याची आपली क्षमता दाखवून दिली आहे. चाचण्यांदरम्यान वंदे भारत स्लीपर रेल्वेने १८० प्रतितास वेग गाठल्याचा व्हिडीओ रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केला आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या पहिल्या प्रोटोटाइपच्या सध्या RDSO फील्ड ट्रायल्स घेतल्या जात आहेत .

भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या या चाचणीमध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेनने तिची १८० किलोमीटर प्रतितास वेग गाठण्याची क्षमता दाखवून दिली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर या रेल्वेचा वापर नागरिकांच्या प्रवासासाठी सुरू केला जाईल.

Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
us action on 19 Indian companies
१९ भारतीय कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध, युक्रेनविरोधी युद्धात रशियाला मदत आरोप
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
Indian jugad To Stop Footwear Theft In The Temple Use This Unique Trick Desi Jugaad Video
VIDEO: मंदिरात किंवा गर्दीच्या ठिकाणी तुमचीही चप्पल चोरीला जाते का? मग हा जुगाड कराच, कधीच चप्पल चोरी होणार नाही
Indias most expensive film flopped after row over same sex kiss
दोन अभिनेत्रींमधील किसिंग सीनमुळे वाद, दिग्दर्शकाचं करिअर संपलं; तब्बल १० कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले फक्त…
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
Man Ask Auto Riksha Driver Dog drop him to Panve
VIRAL VIDEO : दादा, पनवेलला सोडाल का? श्वान बनला रिक्षाचालक; तरुणाने गंमत करताच पाहा कसे दिले एक्स्प्रेशन

वंदे भारत स्लीपर ही नावाप्रमाणेच भारतीय रेल्वेची स्लीपर प्रकार आहे. या ट्रेनची निर्मिती आणि रचना ही दूर अंतराच्या रात्रीच्या प्रवासासाठी करण्यात आली आहे आणि ही रेल्वे प्रीमियम राजधानी एक्सप्रेसपेक्षा चांगल्या दर्जाची असल्याचे सांगितले जाते.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये एक पूर्ण भरलेला ग्लास मोबाईल फोनच्या बाजूला ठेवलेला दिसत आहे. ट्रेनची गती १८० किलोमीटर प्रतितास असताना देखील हा ग्लास जागेवर स्थीर दिसून येत आहेत, यातून रेल्वेच्या गुणवत्तेचा अंदाज लावला जाऊ शकतो.

तीन दिवसांच्या चाचण्यांमध्ये रेल्वेने हा यशाचा टप्पा गाठला आहे. २ जानेवारी रोजी झालेल्या चाचणीत रेल्वेने कमाल १८० किलोमीटर प्रतितासचा वेग गाठला. पण प्रवाशांसाठी या ट्रेनच्या १६० किलोमीटर प्रतितास वेगाला मंजूरी मिळाली आहे.

हेही वाचा>> PM Modi : “अण्णा हजारेंना पुढे करत बेईमान लोकांनी दिल्लीला आपत्तीत ढकलले”, विधानसभेच्या तोंडावर पंतप्रधानांकडून ‘आप’वर टीका

वंदे भारत ट्रेनने गुरूवारी ३० किलोमीटरच्या राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील कोटा ते लबान प्रवासादरम्यान १८० किलोमीटर प्रतितास वेग गाठला. याआधी १ जानेवारी २०२५ रोजी रोहान खुर्द ते कोटा या ४० किमी प्रवासादम्यान या रेल्वेने हीच गती गाठली होती.

या चाचण्यांनंतर रेल्वे सुरक्षा आयुक्त वंदे भारत स्लीपर रेल्वेच्या कमाल वेगाचे मुल्यांकन करतील. याचा रिपोर्ट रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्डाला पाठवला जाईल.अखेरचे मुल्यांकन झाल्यानंतरच वंदे भारत स्लीपर ट्रेनला अधिकृत प्रमाणपत्र दिले जाईल आणि याची नियमित सेवा सुरू केली जाईल.

Story img Loader