दर महिन्याच्या पहिल्या तारखेला राज्याच्या सचिवालयामध्ये वंदे मातरम् म्हणण्याची प्रथा बंद करण्याच्या निर्णयावरून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी घूमजाव केले आहे. वंदे मातरमला आमचा विरोध नाही, ही प्रथा काही कालावधीसाठी स्थगित केली आहे, नव्या स्वरूपामध्ये पोलीस वाद्यवृदांच्या सुरावटीवर ते पुन्हा सुरू करण्यात येईल आणि त्यामध्ये सर्वसामान्य जनतेलाही सहभागी करून घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मध्य प्रदेशमध्ये बाबूलाल गौर मुख्यमंत्री असताना सचिवालयामध्ये दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी वंदे मातरम् म्हणावे असा निर्णय घेण्यात आला होता आणि तेव्हापासून ही प्रथा कायम होती. मात्र कमलनाथ यांनी सत्तेवर येताच ही प्रथा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे १ जानेवारी रोजी सचिवालयामध्ये वंदे मातरम् म्हणण्यात आले नाही. त्यावर भाजपने जोरदार टीका केली.

वंदे मातरम् मुळे विशिष्ट वर्गाच्या भावना दुखावल्या जातात म्हणून कमलनाथ यांनी हा निर्णय घेतल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी केला. तर विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सचिवालयाच्या आवारामध्ये वंदे मातरम् म्हणणार असल्याचे ट्वीट चौहान यांनी केले आहे. या मुद्दय़ावरून आता कमलनाथ यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.