ज्ञानवापी मशीद प्रकरणामुळे देशात मागील काही दिवसांपासून वातावरण तापलेले आहे. वाराणसी येथील दिवाणी न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. दरम्यान, या खटल्याची सुनावणी घेणार रवी कुमार दिवाकर यांना पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे. तसा दावा दिवाकर यांनी केला असून त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात अली आहे.

हेही वाचा >>> महाराष्ट्रात नोकऱ्या मिळवण्यासाठी यूपीमधील शाळांत मराठी शिकवा, भाजपा नेत्याची योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी

makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Supreme Court on bulldozer action (1)
अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी ‘हे’ नियम पाळा, थेट सर्वोच्च न्यायालयानंच घालून दिली नियमावली!
Public sector recruitment process, marks, transparency,
सार्वजनिक क्षेत्रातील भरती प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक, गुण रोखून धरणे पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण करणारे, उच्च न्यायालयाची टिप्पणी
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा
Ajit Pawar lashed out at the group over the issue of disclaimer regarding the clock symbol print politics news
घड्याळाबाबत अस्वीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवार गटाला फटकारले
loksatta readers feedback
लोकमानस: संशय आणि असुरक्षिततेचा परिणाम

न्यायाधीश दिवाकर यांना पत्राद्वारे धमकी मिळाल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती मंगळवारी गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), पोलीस महासंचालक (डीजीपी) आणि वाराणसी पोलीस आयुक्तांना दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काशिफ अहमद सिद्दीकी नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिली असून हा व्यक्ती इस्लामिक आगाझ चळवळीशी संंबंधित आहे.

हेही वाचा >>> कॅन्सरवर रामबाण उपाय सापडला? ‘या’ औषधाच्या सेवनाने एकाच वेळेस १८ जण कॅन्सरमुक्त; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. “ज्ञानवापी मशीद परिसराचे सर्वेक्षण ही सामान्य प्रक्रिया वक्तव्य तुम्ही केले आहे. तुम्ही मूर्तीपूजक आहात. तुम्ही मशिदीला मंदीर म्हणून घोषित कराल. मुर्तिपूजक, काफिर आणि हिंदू न्यायाधिशाकडून योग्य निर्णयाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही,” असे या पत्रात म्हणण्यात आले आहे.

देशात करोना रुग्णसंख्येत ४१ टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्रात १८८१ नव्या रुग्णांची नोंद

वारणसीचे पोलीस सतिश गणेश यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून वारणसीचे पोलीस उपायुक्त याबाबत तपास करत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच न्यायाधीशांना आगवीची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे, असेदेखील सतिश गणेश यांनी सांगितले आहे. न्यायाधीश दिवेकर यांच्या सुरक्षेसाठी ९ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> मोबाईल गेम खेळू न दिल्याने आईची हत्या; बहिणीला खोलीत कोंडलं; तीन दिवस मृतदेहासोबतच वास्तव्य

एप्रिल महन्याच्या अखेरीस न्यायाधीश दिवेकर यांनी ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या सर्वेक्षणाचा अहवाल १९ मे रोजी न्यायालयासमोर मांडण्यात आला होता. या सर्वेक्षणानंतर ज्ञानवापी मशीद परिसरात शिवलिंग असल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात येत आहे. तर मुस्लीम पक्षाकडून हे शिवलिंग नसून कारंजे असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा >>> प्रेषित मोहम्मद अवमानकारक टिप्पणी प्रकरण : संयुक्त राष्ट्राने दिली प्रतिक्रिया, केला सहिष्णुतेचा उल्लेख

दरम्यान, न्यायाधीश दिवेकर यांना धमकीचे पत्र आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. “या दिवाणी खटल्याला एका विशेष खटल्याचे रुप देऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या बिघडलेल्या वातावरणामुळे माझे कुटुंबीय माझ्या सुरक्षेबाबत चिंतेत आहेत. तसेच मलादेखील त्यांच्या सुरक्षेची चिंता लागली आहे,” अशी प्रतिक्रिया दिवाकर यांनी दिली आहे.