माजी आयपीएल प्रमुख आणि गैरव्यवहाराप्रकरणी आरोपी असलेले ललित मोदी यांनी मंगळवारी रात्री ट्विटरच्या माध्यमातून भाजप खासदार वरूण गांधी यांच्यावर खळबळजनक आरोप केले. वरूण गांधी यांनी काही वर्षांपूर्वी माझ्याकडे सोनियांची मदत मिळवून देण्याच्या मोबदल्यात ३८० कोटींची मागणी केल्याचा खळबळजनक खुलासा ललित मोदी यांनी केला आहे. काही वर्षांपूर्वी मी लंडनमध्ये वास्तव्याला असताना वरूण गांधी माझ्या घरी आले होते. त्यावेळी वरूण गांधी यांनी मी माझ्या काकुबरोबर (सोनिया गांधी) बोलून तुमच्यात असलेले सर्व वाद मिटवून देईन, असे सांगितले होते. त्या मोबदल्यात वरूण गांधींनी आपल्याकडे ३८० कोटींची मागणी केली होती. हे सर्व पैसे सोनिया गांधींच्या इटलीतील बहिणीकडे सोपविण्याचा प्रस्ताव वरूण गांधींनी आपल्यासमोर ठेवल्याचे ललित मोदी यांनी आपल्या ट्विटसमध्ये म्हटले आहे. आता वरूण गांधी ही गोष्ट नाकारणार का?, हो मला आशा आहे, ते नक्कीच तसे करतील, असेही मोदींनी आपल्या ट्विटसमध्ये म्हटले आहे.
वरूण गांधींनी बुधवारी सकाळी मोदींनी केलेले सर्व आरोप निराधार असल्याचे सांगत नाकारले आहेत. गेल्याच आठवड्यात ललित मोदींनी प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वडेरा यांनी आपली लंडनमध्ये भेट घेतल्याचे सांगत गांधी कुटुंबियांना अडचणीत आणले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा