आपले पुत्र व सुलतानपूरचे भाजप खासदार वरुण गांधी उत्तर प्रदेशात भाजपप्रणीत सरकारचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत व केंद्राप्रमाणे राज्यातही भाजपचे सरकार असेल, तर त्याचा उत्तर प्रदेशला फायदाच होईल, अशा शब्दात केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी वरुण गांधी यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावरची दावेदारी जाहीर करून टाकली. महिला व बालविकासमंत्री असलेल्या वरुणच्या मातोश्री मेनका गांधी यांनी सांगितले, की राज्यात आमचे सरकार असणे केव्हाही चांगले कारण अधिकाराने आम्ही कामे करून आणू शकू. जर आपला मुलगा वरुण मुख्यमंत्री झाला तर त्याचा पिलीभीतला मोठा फायदा होईल.

Story img Loader