आयपीएल गैरव्यवहारातील आरोपी ललित मोदी यांना मदत केल्यावरून आधीच अडचणीत सापडलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्यापुढील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. वसुंधराराजे यांनी 2007 मध्ये देशातील प्रतिष्ठेच्या ‘पद्म’ पुरस्कारांसाठी ललित मोदी यांच्या नावाची शिफारस केली होती, अशी माहिती काही माध्यमांनी दिली आहे.
2007 मध्ये राजस्थानात वसुंधराराजे यांचे सरकार सत्तेवर होते. त्यावेळी त्यांनी ललित मोदी यांच्या नावाची शिफारस या पुरस्कारासाठी केली होती. राजस्थानमध्ये क्रिकेटच्या प्रसारासाठी ललित मोदी यांनी केलेल्या भरीव कामगिरीमुळे त्यांचे नाव त्यावेळी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले होते.
राजस्थान क्रिकेट संघटनेचे माजी सचिव सुभाष जोशी यासंदर्भात म्हणाले, ललित मोदी यांचे नाव पद्म पुरस्कारांसाठी पाठविण्याच्या वसुंधराराजे यांच्या निर्णयामध्ये काहीही गैर नाही. त्यावेळी ललित मोदी त्यांच्यावरील सर्व जबाबदाऱया यशस्वीपणे पार पाडत होते. त्यामुळे त्यांच्या नावाची शिफारस करण्यात काहीच गैर नाही. ते त्यावेळी राजस्थान क्रिकेट संघटनेचे अध्यक्षही होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा