राजस्थानमध्ये कॉंग्रेसला धूळ चारत भाजपने बहुमत प्राप्त केल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार वसुंधरा राजे यांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. राजे यांनी मंगळवारी आ.गुलाबचंद कटारिया व पक्षाच्या अन्य दोन नेत्यांसह राजभवनात जाऊन राज्यपाल मार्गारेट अल्वा यांची भेट घेतली आणि सरकारस्थापनेबाबत चर्चा केल्याची माहिती राज भवनच्या सूत्रांनी दिली. राजे यांची सोमवारी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली असून १३ डिसेंबरला त्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील़

Story img Loader