पाकव्याप्त काश्मीर आणि काश्मीर या दोन्ही प्रदेशातील नागरिकांना वाटत असेल आणि भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांचीही तयारी असेल, तर स्वतंत्र अखंड काश्मीर निर्माण करायला हरकत नाही, असे वक्तव्य माजी पत्रकार आणि योगगुरू रामदेवबाबा यांचे निकटवर्तीय वेद प्रताप वैदिक यांनी केले आहे.
वैदिक यांनी आपल्या पाकिस्तान भेटीवेळी जमात उद दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीवरून वाद निर्माण झाला असताना आता त्यांनी काश्मीरसंदर्भात केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे. डॉन न्यूज वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वैदिक यांनी काश्मीरसंदर्भात विचार मांडले. त्यावेळी त्यांनी पाकव्याप्त काश्मीर आणि काश्मीर या दोन्ही प्रदेशातील नागरिकांना वाटत असेल आणि भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांचीही तयारी असेल, तर स्वतंत्र अखंड काश्मीर निर्माण करावा. मात्र, असे केल्यास त्याची सर्वाधिक डोकेदुखी पाकिस्तानलाच होणार आहे, असे वैदिक यांनी म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा