भारत भ्रमंतीसाठी निघालेल्या सुप्रसिद्ध महिला बायकर वीणू पालिवाल यांचा मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. ४० वर्षीय वीणू या आपल्या आवडत्या हार्ले डेव्हिडसन मोटारसायकलवरून भारत भ्रमंतीला निघाल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा मित्र दीपेश देखील प्रवासात सोबत होता. मात्र, सोमवारी संध्याकाळी विदिशा जिल्ह्यातील ग्यारपूर येथे वीणू यांची मोटारसायकल घसरली. अपघातात जखमी झालेल्या वीणू यांना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
‘लेडी ऑफ द हार्ले’ अशी ओळख असलेल्या वीणू या हार्ले डेव्हिडसन मोटारसायकल ताशी १८० किमी वेगाने चालवायच्या. मोटारसायकलीवरून केलेल्या भारत सफरीचा माहितीपट बनविण्याची त्यांची इच्छा होती.
भारत भ्रमंतीसाठी निघालेल्या महिला बायकरचा अपघाती मृत्यू
वीणू पालिवाल या हार्ले डेव्हिडसन बाईक चालवायच्या
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड
Updated:

First published on: 12-04-2016 at 15:43 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veenu paliwal woman biker dies in road accident in madhya pradesh