Veer Savarkar वीर सावरकर चित्पावन ब्राह्मण होते तरीही गोमांस खायचे असं वक्तव्य काँग्रेस नेते आणि कर्नाटक सरकारमध्ये मंत्री असलेल्या दिनेश गुंडूराव यांनी केला आहे. दिनेश गुंडुराव हे कर्नाटक सरकारमध्ये आरोग्य मंत्री आहेत. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी वीर सावरकरांबाबत केलेल्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. वीर सावरकर ( Veer Savarkar ) यांनी गोहत्येचा विरोध कधीही केला नाही असंही गुंडूराव यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले दिनेश गुंडूराव?

“वीर सावरकर ( Veer Savarkar ) चित्पावन ब्राह्मण होते, तरीही ते सार्वजनिक ठिकाणी गोमांस खात असत. महात्मा गांधी हे हिंदू सांस्कृतिक रुढीवादाचा मूर्तीमंत उदाहरण होते. मात्र ते कट्टर शाकाहारी होते. तसंच गांधीजी हे लोकशाहीवादी नेते होते. मोहम्मद अलि जिना हे कट्टर नव्हते पण वीर सावरकर कट्टर होते. काही लोक असाही दावा करतात की जिना निषिद्ध असलेल्या डुकराचं मांस चवीने खायचे. मात्र जिना मुस्लिमांचे हिरो ठरले होते.” असं वक्तव्य दिनेश गुंडुराव यांनी केलं.

देशात नथुराम गोडसेच्या विचारांची पाळमुळं घट्ट होत आहेत

नथुराम गोडसेच्या विचारांची पाळंमुळं घट्ट होत आहेत असाही दावा दिनेश गुंडुराव यांनी केला. याच विचाराने महात्मा गांधी यांची हत्या केली. महात्मा गांधी धार्मिक होते, सध्याच्या घडीला मात्र कट्टरतावाद फोफावतो आहे. गोरक्षणाच्या नावाखाली कुणालाही मारहाण करण्यात येते. हे विचार वीर सावरकरांचे ( Veer Savarkar ) नाहीत. सावरकरांच्या कट्टरतावादाचा सामना करण्यासाठी गांधींचे विचार आजही प्रेरक आहेत असंही दिनेश गुंडुराव म्हणाले. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलंं असता त्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

हे पण वाचा- Sushilkumar Shinde : सुशीलकुमार शिंदेंच्या पुस्तकात वीर सावरकरांच्या कार्याचा गौरव, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “राहुल गांधींनी….”

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

काँग्रेसकडून वारंवार वीर सावरकर यांचा अपमान केला जातो. गायीवर वीर सावरकर ( Veer Savarkar ) यांनी त्यांचे विचार मांडले आहेत. शेतकऱ्याला गाय ही कायमच कशी महत्त्वाची असते. त्यामुळे तिला मातेचा दर्जा दिला आहे हे वीर सावरकर यांनी मांडून ठेवलं आहे. पण वीर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधींनी चुकीची वक्तव्यं केली. काँग्रेसचे नेते हीच परंपरा पुढे नेताना दिसत आहेत अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

काँग्रेस पक्ष खोटारडा-अनुराग ठाकूर

काँग्रेस पक्ष खोटारडा असल्याचा पलटवार केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला. भाजपाने गुंडुराव यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. भारत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही, असे ठाकूर म्हणाले. त्यांच्याकडून काँग्रेसने अद्याप कोणताच बोध घेतला नाही. काँग्रेस स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करत नाही हे पुन्हा सिद्ध झाल्याचा दावा ठाकूर यांनी केला.