व्हेनेझुएलाचे विरोधी पक्षनेते लुईस मॅन्युअल डायझ यांची बुधवारी सायंकाळी निवडणूक प्रचार सभेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तेथील निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर आता तणाव निर्माण झाला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
तुरुंगात असलेल्या एका नेत्याच्या पत्नी लिलियन टिंटोरीही सभेस उपस्थित होत्या. डायझ हे अध्यक्ष निकोलस मादुरो यांचे टीकाकार होते. जस्टीस फर्स्ट पक्षाचे नेते अब्राहन फर्नाडेझ यांनी सांगितले, की लुईस गोळ्या लागून रक्ताच्या थारोळ्यात पडले. डेमोक्रॅटिक अॅक्शन पार्टीचे हेन्ही रामोस अलुप यांनी सांगितले, की डायझ यांना जवळून गोळ्या घालण्यात आल्या. टिंटोरी यांनी शेजारच्या दुकानात आसरा घेतला. मादुरो यांचा या निवडणुकीत पराभव होण्याची शक्यता वर्तवली असून नॅशनल असेंब्लीसाठी ६ डिसेंबरला निवडणुका होत आहेत. त्यामुळे अध्यक्षांची सत्तेवरील पकड सैल होत चालली आहे.
First published on: 28-11-2015 at 00:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Venezuela opposition leader shoot