डाव्या विचारांच्या आणि प्रादेशिक पक्षांची मोट बांधून तयार झालेली तिसरी आघाडी म्हणजे ‘पार्किंग स्लॉट’ आहे, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते वेंकय्या नायडू यांनी तिस-या आघाडीची खिल्ली उडविली आहे. तिस-या आघाडीकडे धोरणांचा आणि विश्वासर्हतेचा अभाव असून या आघाडीतील प्रत्येकाला फक्त पंतप्रधानपदाची लालसा आहे. त्यामुळे तिस-या आघाडीतील प्रत्येकाने आपला हेतू साध्य करण्यासाठी आघाडीचा पोकळ डोलारा उभारल्याचे वेंकय्या नायडू म्हणाले. तसेच तिस-या आघाडीला मत देणे म्हणजे काँग्रेसला मत दिल्यासारखे आहे. काँग्रेसच्या विरोधात असणा-या जनमतात फुट पाडण्यासाठी तिसरी आघाडी आकारला आली असल्याची टीका यावेळी वेंकय्या नायडू यांनी केली. काँग्रेस पक्षाने आपली विश्वासर्हता गमावली असून संपूर्ण देशाचे लक्ष आता भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याकडे लागून राहिले असल्याचे नायडू यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Venkaiah naidu terms third front a parking slot