केंद्र सरकारने ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर केली आहे. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार हे भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानंतरचे दुसऱ्या क्रमाकांचे पुरस्कार आहेत. १९५४ साली हे पुरस्कार देण्यास सुरूवात झाली. दरवर्षी २५ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कारसाठी निवड झालेल्या व्यक्तींची नावे जाहीर केली जातात.
हे वाचा >> विश्लेषण: पद्म पुरस्कार विजेत्यांची निवड कशी होते?
यावर्षीही अनेक मान्यवरांना पद्म पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पाच पद्मविभूषण, १७ पद्मभूषण आणि ११० पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या यादीत ३० महिलांचा समावेश आहे. एकूण १३२ पैकी महाराष्ट्रातील १२ मान्यवरांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत. कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, सनदी सेवा, व्यापार आणि उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवर पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहेत. पद्मविभूषण पुरस्कार मिळालेले आणि एकूण महाराष्ट्रातील पुरस्कारप्राप्त मान्यवरांची यादी पाहू.
पद्मविभूषण (एकूण पाच)
- वैजयंतीमाला बाली (कला / तमिळनाडू)
- के. चिरंजीवी (कला / आंध्र प्रदेश)
- एम. व्यंकय्या नायडू (राजकीय नेते / आंध्र प्रदेश)
- बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर) (समाजसेवा / बिहार)
- पी. सुब्रह्मण्यम (कला / तमिळनाडू)
Video: प्रथम पद्मविभूषण कोणाला? कशी होते निवड? जाणून घ्या इतिहास
पद्मभूषण (एकूण २२ / महाराष्ट्रातील ६)
- हॉर्मुसजी एन. कामा (साहित्य व पत्रकारिता / महाराष्ट्र)
- अश्विन बालचंद मेहता (मेडिसीन / महाराष्ट्र)
- राम नाईक (सार्वजनिक व्यवहार / महाराष्ट्र)
- दत्तात्रय अंबादास राजदत्त (कला / महाराष्ट्र)
- प्यारेलाल शर्मा (कला / महाराष्ट्र)
- कुंदन व्यास (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता / महाराष्ट्र)
पद्मश्री (एकूण ११० / महाराष्ट्रातील ६)
- उदय विश्वनाथ देशपांडे (क्रीडा / महाराष्ट्र)
- मनोहर डोळे (औषध / महाराष्ट्र)
- झाकीर आय काझी (साहित्य व शिक्षण / महाराष्ट्र)
- चंद्रशेखर मेश्राम (औषध / महाराष्ट्र)
- कल्पना मोरपारिया (व्यापार व उद्योग / महाराष्ट्र)
- शंकर बाबा पापळकर (समाज सेवा / महाराष्ट्र)