Lal Krishna Advani admitted to hospital : भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या आडवाणी यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील सुत्रांनी दिली आहे. न्यूरोलॉजी विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. विनित सुरी यांच्या नेतृत्वाखाली त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ९६ वर्षीय लालकृष्ण आडवाणी यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात आणण्यात आले होते. यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यातदेखील आडवाणी यांना याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांना अचानक रुग्णालयात का दाखल करण्यात आले? याबद्दल अद्याप सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.
आडवाणी यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यातदेखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जुलैमध्ये त्यांना एम्स रुग्णालयात तर ऑगस्ट महिन्यात अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून लालकृष्ण आडवाणी यांना आरोग्यविषयक तक्रारींचा सामना करावा लागत आहे.
लालकृष्ण आडवाणी यांना याच वर्षी भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ३० मार्च २०२४ या दिवशी त्यांच्या निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार प्रदान केला. याआधी २०१५ लालकृष्ण आडवाणी यांना पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आले आहे. लोकसभेत सर्वाधिक काळ विरोधी पक्षनेते म्हणून काम करणारे नेते असाही लालकृष्ण आडवाणी यांचा लौकिक आहे.
दिल्लीत आल्यानंतर लालकृष्ण आडवाणी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून स्वयंसेवक म्हणून आपल्या पुढील कारकीर्दीला सुरुवात केली आणि पुढे ते संघाचे प्रचारक झाले. पुढे आडवाणी यांनी १९५८ ते १९६३ या दरम्यान त्यांनी दिल्ली प्रदेश जनसंघाचं सचिवपद भूषवलं. १९६० मध्ये त्यांनी साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’मध्ये सहाय्यक संपादक म्हणूनही काम केले. त्यानंतर १९६७ मध्ये त्यांनी पूर्णवेळ राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला.
न
ॉ