मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रीमंडळ विस्तार काल (बुधवार) पार पडला. यामध्ये ४३ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मोदी सरकारने काही नेत्यांना पदोन्नती तर काही मंत्र्यांना डच्चू दिला. डच्चू दिलेल्या मंत्र्यांमध्ये अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे. मोदी सरकारने कामगिरीच्या आधारावर नवीन मंत्रीमंडळ गठीत केल्याची चर्चा आहे. परंतु या सर्वांमध्ये अशी काही नावे आहेत जी त्यांच्या कामाच्या जोरावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळचे आहेत. त्यातील एक नाव म्हणजे अनुराग ठाकूर यांचं आहे. ज्यांना पदोन्नतीच्या स्वरूपात त्यांनी केलेल्या कामाची पोहोच पावती मिळाली आहे. हिमाचलचे माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धूमल यांचे पुत्र अनुराग ठाकूर यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासोबत राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देखील पार पाडली. दरम्यान, त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून पदोन्नती मिळाली आणि एका मोठ्या विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली गेली.
अनुराग ठाकूर यांनी आज माहिती व प्रसारण मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. मंत्रालयाचे कार्यभार स्वीकारल्यानंतर ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ७ वर्षात या मंत्रालयाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचे मोठे काम केले असून हा वारसा पुढे नेण्यासाठी आपण उत्सुक आहोत. पंतप्रधानांनी माझ्यावर सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. तसेच अनुराग ठाकूर यांनी निर्मला सीतारमण यांचे देखील आभार मानले. ठाकूर यांनी निर्मला सीतारमण यांची भेट घेत वित्त व कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयात सहकार्य व मार्गदर्शन केल्याबद्दल आभार मानले.
Delhi: Minister of Information and Broadcasting & Youth Affairs and Sports Anurag Thakur called on Finance Minister Nirmala Sitharaman and thanked her for her support and guidance at the Ministry of Finance & Corporate Affairs.
Thakur was an MoS in the Ministry. pic.twitter.com/gak2ZJim31
— ANI (@ANI) July 8, 2021
हेही वाचा- योगायोग! ज्योतिरादित्य शिंदे यांना मिळालं ३० वर्षांपूर्वी वडिलांनी सांभाळलेलं खातं
तेव्हा अनुराग सरकारची ढाल बनले होते
हरियाणामध्ये भाजपाचे सरकार स्थापनेमागे अनुराग ठाकूर यांचे नाव घेतले जाते. तसेच जम्मू-काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकूर यांच्या नेतृत्वात पक्षाने चमकदार कामगिरी केली. पक्षाने जी जबाबदारी ती अनुराग यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. तसेच काँग्रेसनेते राहुल गांधी राफेल आणि पीएम केयर्स मोदी सरकारवर टीका करत होते तेव्हा अनुरागही सरकारची ढाल बनले होते.
हेही वाचा- Modi Cabinet expansion : शहा यांच्याकडे सहकार, मंडाविया आरोग्यमंत्री
युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
अनुराग राजकीय क्षेत्र आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रात खूपच सक्रिय आहे. हिमाचलच्या हमीरपूर सीटचे खासदार अनुराग ठाकूर हे मोदी सरकारच्या युवा मंत्र्यांपैकी एक आहेत. अनुराग ठाकूर ४६ वर्षांचे आहेत आणि ते अर्थ राज्यमंत्री आणि बीसीसीआयचे अध्यक्ष राहिले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात अनुराग ठाकूर यांची कॅबिनेट मंत्री म्हणून पदोन्नती झाली आहे. तसेच त्यांना माहिती व प्रसारण मंत्री करण्यात आले असून त्याबरोबरच युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारही सोपविण्यात आला आहे.