अतिसंवेदनशील जम्मू-काश्मीरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी गुरुवारी सकाळी विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांना जम्मू विमानतळावर शहरात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले.
तोगडिया हे जेट एअरवेजच्या विमानाने दिल्लीहून जम्मूला आले. विमानतळावर उतरल्यावर ते बाहेर पडण्यासाठी जाऊ लागल्यावर पोलिसांनी त्यांना रोखले आणि जम्मूमध्ये प्रवेश करण्यास प्रशासनाने त्यांच्यावर निर्बंध घातले असल्याचे सांगितले. तोगडिया यांना दुपारच्या विमानाने दिल्लीला परत पाठविण्यासाठी उपाय योजण्यात आले आहेत, असे प्रशासानाने सांगितले.
दरम्यान, विश्व हिंदू परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रमाकांत दुबे हे आपल्या कार्यकर्त्यांबरोबर तोगडिया यांच्या स्वागतासाठी विमानतळाबाहेर उभे होते. त्यांनी तोगडिया यांना शहरात प्रवेश करण्यापासून रोखल्याचा निषेध केला.

Story img Loader