विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘रईस’ या सिनेमाच्या चित्रीकरणाला भुज येथे विरोध सुरू केला आहे. असहिष्णुतेबाबत त्याने केलेल्या वक्तव्यामुळे विहिंप आंदोलन करत आहे.
विहिंप कार्यकर्त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन शाहरुखच्या चित्रपट चित्रीकरणास परवानगी नाकारण्यात यावी, असे निवेदन दिले आहे. बुधवारी याच मागणीसाठी विहिंप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. यावेळी कार्यकर्त्यांनी शाहरुखविरोधात जोरदार घोषणा दिल्या तसेच त्याचे पोस्टरही जाळण्यात आली.
विहिंप कार्यकर्ते चित्रीकरण सुरू असलेल्या ठिकाणीही जाणार होते. मात्र, पोलिसांनी योग्य वेळी कारवाई करून त्यांना भुज शहरात रोखले, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक एम.बी. परमार यांनी दिली. शाहरुखने गेल्या वर्षी २ नोव्हेंबर रोजी देशात सर्वोच्च पातळीवर असहिष्णुता असल्याचे म्हटले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा