राम मंदिराच्या प्रश्नावर नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतरच त्यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्यात येईल, असे विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी शुक्रवारी सांगितले.
जे पक्ष राम मंदिर प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करतील. पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये या विषयाचा समावेश करतील. त्यांनाच विश्व हिंदू परिषद पाठिंबा देण्याचा विचार करेल. जर नरेंद्र मोदी यांना विश्व हिंदू परिषदेचा पाठिंबा हवा असेल, तर त्यांनी या प्रश्नावर आपली भूमिका सांगितली पाहिजे, असे तोगडिया म्हणाले.