नवी दिल्ली : उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी रविवारी येथील नवीन संसद भवनात राष्ट्रध्वज फडकावून ध्वजवंदन केले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासमवेत नवीन संसद भवनाच्या ‘गज द्वारा’पाशी हा सोहळा झाला. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पाच दिवसीय अधिवेशनाच्या एक दिवस आधी हा ध्वजवंदन सोहळा झाला. त्यामुळे संसद अधिवेशनाचे कामकाज जुन्या इमारतीऐवजी नव्या इमारतीत होण्याची शक्यता बळावली आहे.

तत्पूर्वी, केंद्रीय राखीव पोलीस दला (सीआरपीएफ) च्या संसदेच्या संरक्षण पथकाने धनखड आणि बिर्ला यांना मानवंदना दिली. या सोहळय़ानंतर धनखड पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, की हा ऐतिहासिक क्षण आहे. भारतात युग परिवर्तन होत आहे. भारताच्या सामर्थ्य आणि योगदानाची जगाला आता पूर्ण जाणीव झाली आहे.  या सोहळय़ास केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, प्रल्हाद जोशी आणि अर्जुन राम मेघवाल यांच्यासह अनेक मंत्री आणि इतर पक्ष नेते उपस्थित होते. धनखड आणि बिर्ला यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Image of BJP MLA T Raja Singh.
T Raja Singh : भाजपा आमदाराने भर कार्यक्रमात फाडला बांगलादेशचा ध्वज, गोव्यात नेमकं काय घडलं?
Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!
Ajit Pawar on Mahavikas Aghadi MLA's Oath as a Maharashtra Legislative assembly Member
“मविआ आमदारांना उद्या शपथ घ्यावीच लागेल, अन्यथा…”, अजित पवारांचा इशारा
devendra fadnavis eknath shinde ajit pawar
Video: शपथविधीनंतर पहिल्याच भाषणात सत्ताप्रमुखांनी दिली संविधानाची ग्वाही; म्हणाले, “संविधानाचा सर्वाधिक सन्मान…”!
aharashtra New CM Devendra Fadnavis Swearing Ceremony Updates
Maharashtra Chief Minister Oath Ceremony : भाजपची छाप, शिवसैनिकांची पाठ लाडक्या बहिणींची उपस्थिती

काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या सोहळय़ाला उपस्थित राहता येणार नसल्याचे कळवले होते. या सोहळय़ाचे खूप उशिरा निमंत्रण मिळाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. खरगे यांनी शनिवारी राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी यांना पत्र लिहून १५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी उशिरा या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाल्याचे कळवले. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीसाठी खरगे सध्या हैदराबादमध्ये आहेत.

Story img Loader