राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड चांगलेच चिडले आहेत. विदेशात जाऊन आपल्या देशावर टीका करणं हे साफ चुकीचं आहे. तसंच भारताच्या संसदेत माईक बंद केला जातो हे राहुल गांधी यांचं म्हणणं गैर आहे. भारताकडे G 20 चं अध्यक्षपद आहे. भारतासाठी हा गौरवशाली क्षण आहे अशावेळी भारतातला एक खासदार विदेशात जाऊन भारतावर टीका करत असेल, देशाचा अपमान करत असेल तर ते कदापि सहन केलं जाणार नाही. उपराष्ट्रपतींनी राहुल गांधींचं नाव घेतलं नाही मात्र त्यांचा रोख राहुल गांधींकडेच होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगदीप धनखड हे वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कर्ण सिंह मुंडक यांच्या उपनिषदावर आधारीत पुस्तकाचं प्रकाशन केलं. त्या कार्यक्रमात राहुल गांधींचं नाव न घेता उपराष्ट्रपतींनी टीका केली आहे. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती म्हणाले की भारताच्या लोकसभेत माईक बंद केला जातो हे इथल्या खासदारने विदेशात जाऊन म्हणणं हा देशाचा अपमान आहे.

राहुल गांधी यांनी केंब्रिजमध्ये केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. तसंच नरेंद्र मोदी हे एक विशिष्ट अजेंडा चालवत आहेत आणि त्याकडे देशाला घेऊन जात आहेत असाही आरोप केला होता. त्यानंतर भाजपानेही त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. तरीही राहुल गांधी यांनी हे बोलणं थांबवलं नव्हतं. या वक्तव्याच्या दुसऱ्या दिवशीही राहुल गांधी यांनी देशाविषयी वक्तव्य केलं होतं. आता उपराष्ट्रपतींनी नाव न घेता राहुल गांधींना खडे बोल सुनावले आहेत.

आणखी काय म्हणाले आहेत उपराष्ट्रपती?

सध्या आपला देश अमृत काळात आहे. सगळे भारतीय यामुळे आनंदात आहेत. आपण अशा काळात असताना देशातला एक खासदार देशाच्या विरोधात बोलतो तेदेखील बाहेरच्या देशात जाऊन. हे कितीतरी दुःखद आणि दुर्दैवी आहे. समृद्ध लोकशाही मूल्यांचं हे हनन आहे असंही उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vice president jagdeep dhankhar targets rahul gandhi for microphone comment scj
Show comments