प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असताना तिरंग्याच्या सन्मानार्थ सँल्यूट न केल्यामुळे भारताचे उपराष्ट्रपती हमीद अंन्सारी हे टीकेचे लक्ष्य होत आहेत. परंतु, राष्ट्रगीतादरम्यान सॅल्यूट न करणं हाच प्रोटोकॉल असल्याचं स्पष्टीकरण उपराष्ट्रपती कार्यालयानं दिलं आहे. उपराष्ट्रपतींचे ओएसडी (Officer on Special Duty) गुरदीप सप्पाल यांनी या वादानंतर ट्वीटरवर याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.


राजपथवरील संचलनाला उपस्थित राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर तिरंग्याच्या सन्मानार्थ सलामी देत असताना उपराष्ट्रपतींनी मात्र मानवंदनेसाठी सॅल्यूट करत नसल्याचे छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. अनेकजणांनी यावर आक्षेप नोंदवला असून विविध चर्चांना उधाण आले आहे.


मात्र, प्रजासत्ताक दिनाच्या संचलनादरम्यान लष्काराकडून मानवंदना स्वीकारण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींचा असतो. राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीतच उपराष्ट्रपती सलामी स्वीकारु शकतात. तसेच युनिफॉर्ममध्ये असलेल्या व्यक्तिंनाच सँल्यूट करण्याचा नियम लागू होतो. उपराष्ट्रपती हमीद अंन्सारी हे युनिफॉर्ममध्ये नव्हते. त्यामुळे त्यांनी सँल्यूट न करणं हे प्रोटोकॉलला धरून असल्याचं राष्ट्रपती कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

Story img Loader