शनिवारी घडलेल्या एका घटनेत बार्सिलोनाच्या ईआय प्राट विमानतळावरून उड्डाण घेण्यासाठी अॅरोलिनेअस अर्जेंटिनास एअरबस ३४० हे प्रवासी विमान धावपट्टीवरून पलिकडे जात असताना रशियन एअरलाईन्सचे युटायर विमान त्याचवेळी त्या धावपट्टीवर उतरत होते, परंतु धावपट्टीवरून पलिकडे जाणारे विमान दृष्टीस पडताच सदर विमानाच्या वैमानिकाने आपले विमान धावपट्टीवर उतरविणे रद्द करून, पुन्हा आकाशात झेप घेतली. त्यानंतर, आकाशात एक गोल गिरकी घेत हे विमान सुखरूपपणे धावपट्टीवर उतरले आणि एक भीषण अपघात टळला. सदर घटनेचा व्हिडीओ बार्सेलोना ईआय प्राटने (Barcelona-El Prat In’tl) आपल्या युट्यूब चॅनलवर टाकला असून, तो आपण इथे पाहू शकता.

Story img Loader