लोकसभेमध्ये सोमवारी जम्मू काश्मीरच्या अर्थसंकल्पासंदर्भात झालेल्या चर्चेदरम्यान राज्यामधील बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जम्मू काश्मीरमधील शिक्षण व्यवस्थेसंदर्भात भाष्य केलं. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये धर कुटुंबियांकडून चालवल्या जाणाऱ्या दिल्ली पब्लिक स्कूलचं उदाहरण दिलं. मात्र त्याचवेळी त्या इतिहासामध्ये अडकण्याऐवजी आता आपण उपाययोजना केल्या पाहिजेत असं मत व्यक्त केलं. दरम्यानच्या चर्चेत सुळे आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यामध्ये शाब्दिक-बाचाबाची झाली.
नक्की वाचा >> Video: The Kashmir Files वरुन मोदींनी सुनावलं; म्हणाले, “ज्यांना वाटतं की हा चित्रपट योग्य नाही त्यांनी…”
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
सुप्रिया सुळे या काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन बोलत असताना जम्मू-काश्मीर मधील शैक्षणिक क्षेत्रावर भाष्य करत होत्या. जम्मू-काश्मीरमध्ये पाच हजार मुलांच्या शिक्षणाची काळजी घेणाऱ्या दिल्ली पब्लिक स्कूलला सरकारकडून नोटीसा पाठवल्या जात असून त्यांना त्रास दिला जातोय असं सुप्रिया यांनी म्हटलंय. अशा नोटीसा पाठवून तुम्ही त्या राज्यातील मुलांचं भलं करत आहात का? किती दिवस आपण होऊन गेलेल्या घटनांबद्दल बोलणार. आपण इतिहासात अडकून न राहता भविष्याचा विचार केला पाहिजे, अशा पद्धतीचा युक्तीवाद सुप्रिया सुळे यांनी केला.
नक्की वाचा >> “तुम्हाला काश्मिरी पंडितांबद्दल काळजी वाटत असेल तर…”; संसदेत सुप्रिया सुळेंनी केली मागणी
आपल्याला कोणाकडून काय मिळालं यापेक्षा आपण काय देऊ शकतो याचा विचार केला पाहिजे असंही त्यांनी भाषणामध्ये म्हटलं. तसेच त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यापासून फारसा बदल घडलेला नाही असं सांगितलं. यावेळी त्यांनी त्यांच्या आधी भाषणामध्ये काश्मिरी पंडितांचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या जितेंद्र सिंह यांना मागील काळात किती हॉटेल्स तिथे बांधले काय सुविधा पुरवल्या अशी विचारणा केली. माझं आधीचं भाषण तुम्ही ऐकयला हवं होतं असंही त्या एका ठिकाणी म्हणाल्या.
नक्की वाचा >> The Kashmir Files संदर्भातील ‘त्या’ पोस्टमुळे स्वरा भास्करवर अनेकजण संतापले; म्हणाले, “तुझ्या सॉफ्ट पॉर्न सिरीजला…”
केंद्रीय मंत्र्याने दिलं उत्तर…
यानंतर जुन्या भाषणाचा संदर्भ आल्याने सुप्रिया सुळे ज्यांना प्रश्न विचारत होत्या ते जिंतेद्र सिंह यांनी जागेवरुन उठून, “आम्ही नाही सांगणार आमच्या आई-वडिलांनी आमच्यासाठी काय केलं असं त्यांना बोलताना मी ऐकलं होतं. नाही सांगायचं तर नका सांगू पण तुमच्या आई-वडिलांमुळेच तुम्ही इतक्या सक्षम झालात की आज संसदेमध्ये उभ्या आहात. दुसऱ्यांकडून आपल्याला काय मिळालं काय नाही हे आपण विसरु शकत नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या आई-वडिलांमुळेच इथे आहात,” असं उत्तर दिलं.
डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो तर…
“मी घराणेशाहीला कधीच काही बोलले नाही. मी नेहमीच त्याबद्दल चांगलं बोलले आहे. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला तर आमच्याशी काय अडचण आहे तुम्हाला?”, असा थेट प्रश्न सुप्रिया यांनी जितेंद्र सिंह यांना विचारला. “आई-वडिलांबद्दल सोडून काहीही बोलावं. आई-बापा काढायचे नाहीत,” असं सुप्रिया यांनी जितेंद्र सिंह यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर आक्षेप घेताना म्हटलं.
नक्की वाचा >> The Kashmir Files संदर्भात पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य; BJP च्या बैठकीत खासदारांना म्हणाले, “असे चित्रपट…”
जितेंद्र सिंह यांनी दिलं स्पष्टीकरण…
“वारसा विसरणे शक्य नाही असं मी म्हणत होतो. मग तो देशाचा असो, समाजाचा असो. मी पर्सनल आयुष्यावर काहीही बोललो नाहीय,” असं स्पष्टीकरण यानंतर जितेंद्र सिंह यांनी दिलं.
मला माझ्या पालकांचा अभिमान…
तर यावेळी सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा तुम्ही माझं जुनं सर्व भाषण ऐकायला हवं होतं, असं सांगितलं. “मला माझ्या पालकांचा फार अभिमान आहे,” असंही सुप्रिया यांनी पुन्हा एकदा सभागृहामध्ये सांगितलं.