रशिया-युक्रेन दरम्यानच्या युद्धाचा आज सातवा दिवस आहे. आज रशिया आणि युक्रेन यांच्यात चर्चेची दुसरी फेरी नियोजित आहे. रशियाचं युक्रेनवरील आक्रमण कायम असून रशियन सैन्य राजधानी किव्ह आणि इतर महत्वाच्या शहरांकडे आगेकूच करत आहे. या भीषण युद्धात युक्रेनचे सैन्य आणि युक्रेनमधील नागरिक देखील रशियाविरोधात उतरले आहेत. अनेक जण आपल्या देशाच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावत रशियन सैनिकांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच एका युक्रेनियन नागरिकाचा रशियन सैन्याला रोखण्यासाठी प्रयत्न करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये युक्रेनियन नागरिक रशियन टँकला रोखण्याच्या प्रयत्नात टँकवर चढताना दिसत आहे. त्यानंतर रशियन सैनिक एकत्र जमल्यानंतर तो युक्रेनियन त्या टँकसमोर बसतो आणि त्याच्याभोवती सैनिक जमल्याचं दिसंतय. हा व्हिडीओ उत्तर युक्रेनमधील चेर्निहाइव्ह प्रदेशातील बाखमाच शहरातील असल्याचं समोर आलंय. “युक्रेनियन नागरिकांनी चेर्निहाइव्ह प्रदेशातील बाखमाच शहरातून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या रशियन टँकची गती कमी केली. युक्रेनियन लोकांचे शौर्य अतुलनीय आहे,” असं ट्वीट व्हिसेग्राड यांनी केलंय.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Navri Mile Hitlerla actress dance on Kishore kumar Eena Meena Deeka song watch video
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकारांचा किशोर कुमार यांच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Image of Zelensky
Russia Vs Ukraine War : “जोपर्यंत नाटोचे सदस्यत्व…”, झेलेन्स्की यांनी का केली युक्रेनमध्ये परदेशी सैन्य तैनात करण्याची मागणी?
Navri Mile Hitlarla
“आता भूतासारखीच…”, लीला नेमकं काय करणार? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय होणार
filght Footage
विमानात नको त्या अवस्थेत सापडले जोडपे! Video झाला व्हायरल, क्रू सदस्यांची चौकशी सुरू, नेटकऱ्यांचा संताप
pushpa in Kolhapur
कोल्हापुरच्या रस्त्यावर फिरतोय पुष्पा! चिमुकले घाबरले तर मोठ्यांनी काढली सेल्फी, पाहा VIRAL VIDEO

असाच आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक युक्रेनियन माणूस समोर उभा राहून रशियन लष्करी काफिलाची गती थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत होता.

दरम्यान, डच मीडिया आउटलेट बीएनओ न्यूजच्या वृत्तानुसार, रशियन सैन्याने दक्षिण युक्रेनमधील खेरसन शहराचा ताबा घेतला आहे. परंतु स्थानिक अधिकार्‍यांकडून याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.

Story img Loader