रशियाने युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्ध सहाव्या दिवशीही सुरुच आहे. युक्रेनची राजधानी किव्ह आणि खार्कीव्ह या पूर्वेकडील प्रमुख शहरांवर ताबा मिळवण्यासाठी रशियन लष्कराकडून मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरु आहेत. मागील आठवड्यामध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली. त्यानंतर सुरु असणाऱ्या संघर्षामध्ये रशियन सैन्याचीही आता दमछाक होताना दिसतेय. तरीही रशियन हवाईदलाच्या माध्यमातून बॉम्ब वर्षाव सुरु आहे. असाच एक हल्ला आज म्हणजेच युद्धाच्या सहाव्या दिवशी रशियाने खार्कीव्हच्या मुख्य सरकारी इमारतीवर केलाय. शहरामधील मुख्यचौकात क्षेपणास्त्राने मारा करण्यात आल्याचा सारा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.
नक्की वाचा >> Ukraine War: हवाई हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; रशियाने खार्कीव्हवर केलेल्या हल्ल्यात गमावले प्राण
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा