रविवारी राजधानी काबूल ताब्यात घेत अफगाणिस्तावर तालिबानने जवळजवळ संपूर्ण कब्जा केला. अमेरिका आणि नाटो फौजा अफगाणिस्तानातून परतण्याची मुदत जवळ येऊ लागताच सक्रिय झालेल्या तालिबानी बंडखोरांनी अवघ्या आठवडाभरातच जवळजवळ संपूर्ण देशावर ताबा मिळवला आहे. तालिबानने रविवारी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, तालिबान लवकरच काबूल येथील अध्यक्षीय प्रासादातून अफगाणिस्तानला पुन्हा ‘इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान’ (आयइए) जाहीर करणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. तालिबान राजवटीची झलक दाखवणारे धक्कादायक चित्र रविवारी काबूलमध्ये पहायला मिळालं. काबूलमधील मुख्य तुरुंग तालिबान्यांनी फोडलं आणि हजारो दहशतवाद्यांनी तुरुंगातून पलायन केलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल नेटवर्कींगवर व्हायरल होतं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा