छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये अफझल खानाचा कोथळा ज्या वाघनखांनी काढला ती वाघनखं लवकरच भारतात आणली जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्धकालीन शस्त्र असलेली वाघनखे ब्रिटनच्या ‘व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम’मध्ये आहेत. ही वाघनखं भारतात आणण्याकरता करार संपन्न झाला आहे. या करारादरम्यान, लंडनच्या रस्त्यावर ढोल ताशांच्या गजरांत जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं आहे. सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मंत्री उदय सामंतही उपस्थित होते.

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने ही वाघनखं आणली जाणार आहेत. मात्र ही वाघनखं फक्त तीन वर्षांसाठीच आणली जात आहेत अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. त्यानुसार, ते १ ऑक्टोबर रोजी ब्रिटनला रवाना झाले. ३ ऑक्टोबर सायंकाळी त्यांनी ब्रिटनच्या ‘व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम’ला भेट दिली. या भेटीत त्यांनी संग्रहालयाचे संचालक ट्रायस्टम हंट यांच्यासह बैठक घेऊन त्यांनी ही वाघनखे भारतात आणण्याकरता सामंजस्य करार केला आहे. १६ नोव्हेंबर रोजी ही वाघनखे भारतात दाखल होणार आहेत. या सामंजस्य करारावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
maharashtra election 2024 yogi adityanath fact check viral video
भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ बुलडोझर घेऊन उतरले मैदानात! लोकांना हात जोडून केलं मतदानाचं आवाहन? Video खरा पण…
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष प्रारंभ होताच ही वाघनखे भारतात परत आणण्याचा संकल्प सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. १५ एप्रिल २०२३ रोजी मुंबई येथे ब्रिटेनचे पश्चिम भारत उप उच्चायुक्त अँलेन गँमेल यांच्यासह ब्रिटनच्या राजकीय व द्विपक्षीय संबंध उपप्रमुख इमोगेन स्टोन यांच्यासोबत बैठक घेवून महाराष्ट्र शासनाने व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाशी पत्रव्यवहार सुरू केला.

वाघनखं भारतात आणण्यासाठी स्वाक्षरी होत असताना लंडनमध्ये उत्साह पाहायला मिळाला. पारंपरिक वेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी ढोल-ताशांच्या गजरात हा आनंदाचा क्षण साजरा केला. त्यामुळे आता महाराष्ट्रात वाघनखे दाखल होण्यासाठी शिवभक्त आतुर झाले आहेत.