Vande Bharat Viral Video: वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोठा गोंधळ झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. प्रवाशांनी अक्षरशः गाडीच्या काचा फोडून बाहेर पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या गोंधळाला एक सिगारेट कारण ठरली होती. सिगरेटचा मोह न आवरल्याने एका प्रवाशाने चक्क ट्रेनच्या टॉयलेटमध्ये जाऊन सिगरेट पेटवली पण त्यानंतर काहीच सेकंदात जे काही घडलं त्याने प्रवासी व व्हिडीओ पाहणारे नेटकरी सुद्धा थक्क झाले आहेत. तिरुपतीहून (Tirupati) सिकंदराबादला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये हा भयानक प्रकार घडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमकं घडलं काय?

वंदे भारत ट्रेन आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) तिरुपतीहून सिकंदराबादला जात होती. ट्रेनने गुडूर स्थानक ओलांडलं होतं आणि ट्रेनचं शेवटचं ठिकाण सुमारे ८ तासांच्या अंतरावर होतं. एका प्रवाशाला सिगारेट ओढण्याची इच्छा झाली पण ट्रेनमध्ये सर्वांसमोर सिगारेटचे झुरके घेणं काही शक्य नव्हतं. अशावेळी त्याने डोकं लावून टॉयलेट गाठलं आणि तिथे जाऊन सिगारेट पेटवली. काही वेळात टॉयलेटमध्ये सिगारेटचा धूर पसरताच लगेच फायर अलार्म वाजू लागला. त्यानंतर स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा काम सुरू झाली आणि संपूर्ण डब्यात एरोसोल फवारणीला सुरुवात झाली.

हे ही वाचा<< तुमचा सल्ला द्या! ऑफिस खूप लांब आहे म्हणत ‘या’ पठ्ठ्याला नोकरी सोडायचीये, त्रास काय आहे नीट वाचा

साहजिकच, फायर अलार्म वाजल्याने प्रवासी गांगरून गेले आणि त्याच गोंधळात जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा पळू लागले. ट्रेनला आग लागल्याच्या भीतीने काहींनी ट्रेनच्या काचा फोडून बाहेर पडण्याचा सुद्धा प्रयत्न केला. दुसरीकडे ज्या महाभागामुळे हा सगळा गोंधळ झाला तो चक्क ट्रेनच्या टॉयलेटमध्येच लपून राहिला होता. त्यानंतर जेव्हा सगळा प्रकार समोर आला आणि पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेतलं तेव्हा तो चक्क विनातिकीट प्रवास करतोय हे ही लक्षात आलं.