Coldplay Concert tickets Thrown in to Garbage : सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेल्या ‘कोल्ड प्ले’ या बँडच्या या कॉन्सर्टची तिकीट मिळवण्यासाठी अनेजण धडपड करत होते. कित्येकांनी दुप्पट ते तिप्पट अशा चढ्या दराने विक्री केली जात असल्याचे प्रकार समोर आले. विशेष म्हणजे, बेकायदेशीररित्या चढ्या दराने तिकीटाची विक्री होत असतानाही अनेकजण हे तिकीट खरेदी करण्यासाठी इच्छुक होते. अनेकांना भरमसाठ रक्कम देऊनही तिकीटं मिळाली नाहीत. पण मुंबईत एक वेगळाच प्रकार घडला आहे. एका महिलेने मुंबईतील कॉन्सर्टची विकत घेतलीली तिकीटं कचऱ्यात फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. प्राची सिंग नावाच्या महिलेने ही घटना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“होय, ही दुर्घटना घडली. काल आम्हाला दोन ‘कोल्ड प्ले’ तिकिटे मिळाली आणि ती जेवणाच्या टेबलावर रॅपरमध्ये ठेवली होती, आज आम्ही तयार झालो, आमचा ड्रायव्हर वाट पाहात होता, आम्ही निघताना बँड्स शोधत होतो आणि आमच्या मोलकरणीने सांगितलं की ते तर सफाई करताना फेकून दिलं”.

सिंग यांनी व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या कचरा घेऊन जाणाऱ्या वाहनाकडे पाहात असताना दिसत आहेत. ज्यामध्ये सफाई कर्मचारी त्यांचे तिकीट शोधताना दिसत आहेत. प्राची सिंग यांनी काही हरकत नाही, कॉन्सर्टसाठी आज जाणं नशीबात नव्हतं, असंही आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

ब्रिटीश रॉक बँड ‘कोल्ड प्ले’ सध्या ‘म्युझिक ऑफ द स्फेअर्स’ या वर्ल्ड टूरचा भाग म्हणून भारताच्या दौऱ्यावर आहे. बँडचा पहिला शो हा शनिवारी (१८ जानेवारी) डीवाय पाटील स्टेडियमवर होता.

कोल्डप्लेच्या कॉन्सर्टची तिकीटे कचऱ्यात फेकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आळा आहे. याला ४३,०००हून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत तर शेकडो लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी याबद्दल दुखः व्यक्त केले आहे. तर अनेकांनी त्यांची खिल्ली उडवत श्वान पथक बोलावण्याचा सल्ला देखील दिला आहे.

कोल्डप्लेच्या कॉन्सर्टचे तिकीटं मिळवणे हे सर्वात कठीण काम बनलं आहे. विशेष म्हणजे या बँडने भारतात फक्त एकच कॉन्सर्ट सादर केली जाणार होती. पण त्यांना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आणखी चार शो ठेवण्यात आले आहेत. असे असूनही या शोची तिकिटे काही क्षणात विकली जात आहेत.
२५ आणि २६ जानेवारी रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या कॉन्सर्टपूर्वी २१ जानेवारीला कोल्डप्ले पुन्हा एकदा मुंबईत कॉन्सर्ट करणार आहीत. ही कॉन्सर्ट Disney+ Hotstar वर थेट लाईव्ह दाखवली जाईल.