व्हिडिओकॉनच्या मोबाईल फोन विभागाने बुधवारी सर्वसामान्यांना परवडेल, अशा नवीन अँन्ड्रॉईड स्मार्टफोनचे अनावरण केले. व्हिडिओकॉनच्या अँन्ड्रॉईड मालिकेतील हा ‘ए२४’ मोबाईल फोन केवळ ४,६९९ रूपयांमध्ये बाजारात उप्लब्ध होणार आहे. व्हिडिओकॉन ‘ए२४’ अँड्रॉइड ४.२.२ जेली बीन या अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. या फोनमध्ये १.२ गिगाहर्टझचा ड्युएल कोअर प्रोसेसर वापरण्यात आला असून, यामध्ये २५६ एबी रॅम आहे. त्याचा टचस्क्रीन ४ इंचाचा आहे. ‘ए२४’चा समोरच्या बाजूस असलेला कॅमेरा ०.३ मेगापिक्सेलचा असून, मागच्या बाजूस असलेला कॅमेरा ३.२ मेगापिक्सेल आहे. ‘ए२४’ मध्ये १४५० एमएएच क्षमतेची बॅटरी वापरण्यात आली आहे.
‘ए२४’चे इतरदेखील अनेक गुणविशेष असून, त्या पैकी महत्वाचे म्हणजे यामध्ये ड्युएल सिम, वाय-फाय, जीपीआरएस एज आणि प्रिलोडेड ऍप्स् आहेत. व्हिडिओकॉनने ‘ए२४’ स्मार्टफोनमध्ये ‘व्ही-स्टोअर’ सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे मोबाईल धारकाला वेगवेगळे ऍप्स्, गेम्स्, डाऊनलोड करता येणार असून, मेल, सोशल साईटसचा वापर सहजतेने करता येणार आहे.
“व्हिडिओकॉन ‘ए२४’ च्या माध्यमातून आम्ही तरूणांच्या व पहिल्यांदा स्मार्टफोन वापरणाऱय़ांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे”, असे ‘ए२४’च्या अनावरण समारंभामध्ये व्हिडिओकॉन मोबाईलचे उत्पादन प्रमुख खलिद झमिर म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ए२४ ची ठळक वैशिष्ट्ये
*४ इंच डब्ल्यूव्हीजीए कॅपॅसिटीव्ह टच स्क्रिन
*१.२ गिगाहर्टझचा ड्युएल कोअर प्रोसेसर
*५१२ एमबी रोम+ २५६ एबी रॅम
* समोरचा कॅमेरा ३.२ मेगापिक्सेल
*मागचा कॅमेरा ०.३ मेगापिक्सेलचा  
*’व्ही-स्टोअर’ सुविधा उपलब्ध  
*अँड्रॉइड ४.२.२ जेली बीन ऑपरेटिंग सिस्टीम  

‘ए२४ ची ठळक वैशिष्ट्ये
*४ इंच डब्ल्यूव्हीजीए कॅपॅसिटीव्ह टच स्क्रिन
*१.२ गिगाहर्टझचा ड्युएल कोअर प्रोसेसर
*५१२ एमबी रोम+ २५६ एबी रॅम
* समोरचा कॅमेरा ३.२ मेगापिक्सेल
*मागचा कॅमेरा ०.३ मेगापिक्सेलचा  
*’व्ही-स्टोअर’ सुविधा उपलब्ध  
*अँड्रॉइड ४.२.२ जेली बीन ऑपरेटिंग सिस्टीम