अहमदाबादमधील गुजरात विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम समाजातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर जमावाने हल्ला केला आहे. या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात नमाज अदा केल्याने त्यांच्यावर हल्ला झाल्याचा दावा केला जातोय. या हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून संतापाची लाट उसळली आहे. फ्री प्रेस जर्नलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सार्वजनिक राज्य विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या ‘ए’ ब्लॉकमध्ये झालेल्या हल्ल्यात पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना सरदार वल्लभभाई पटेल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

rape college student in Odisha
Rape On Girl : महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, कॅफेतला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग, सहा नराधम अटकेत
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून

व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये जमावाने विद्यार्थ्यांच्या खोलीवर दगडफेक करून त्यांच्या वाहनांवर हल्ला केला. तसंच, वसतिगृहाच्या मालमत्तेची तोडफोड केली. हे विद्यार्थी आफ्रिका आणि मध्य आशियातील आहेत. ते म्हणाले, वसतिगृहाच्या खोलीत रमजान तारवीहनिमित्त नमाज पढत असताना आमच्यावर हल्ला झाला. रमजान महिन्यात, तारवीह नमाज ही विशेष प्रार्थना आहे, जी मुस्लिम समाजाकडून स्वेच्छेने केली जाते. ही प्रार्थना रात्रीच्या वेळी केली जाते.

एका व्हिडिओमध्ये भगवी शाल घातलेला एक व्यक्ती विद्यार्थ्यांना शिवीगाळ करताना आणि हिंदुत्वाच्या घोषणा देताना दिसत आहे. त्याने श्रीरामाच्या नावाच्याही घोषणा केल्या आहेत. वसतिगृहाचा सुरक्षा रक्षक जमावावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, त्याचा प्रयत्न असफल ठरला.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही, असा दावाही पीडितांनी केला आहे. “पोलिसांनी त्यांना जाऊ दिलं. ते पळून जात होते! त्यांनी सर्व काही तोडले. ते निघून गेले. पोलिस त्यांना अटक करत नाहीत. हा लोकशाही देश आहे, हा धर्मनिरपेक्ष देश आहे”, असे एका विद्यार्थ्याने सांगितले.

पोलिसांनी काय सांगितलं?

गुजरात विद्यापीठात अज्ञात हल्लेखोरांनी परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला केल्यानंतर, अहमदाबादचे पोलिस आयुक्त जीएस मलिक म्हणाले, “सुमारे ३०० परदेशी विद्यार्थी गुजरात विद्यापीठात शिकतात आणि सुमारे ७५ परदेशी विद्यार्थी ए ब्लॉकमध्ये (वसतिगृहात) राहतात. काल (१६ मार्च) रात्री साडेदहा वाजता एक विद्यार्थ्यांचा एक गट नमाज अदा करत होता. सुमारे २०-२५ जण तिथे आले आणि त्यांनी येथे नमाज का अदा करत आहात, त्याऐवजी मशिदीतच नमाज पठण करा, अशी विचारणा केली. त्यांच्यात वादावादी झाली, दगडफेक झाली आणि बाहेरून आलेल्या लोकांनी त्यांच्या खोल्यांची तोडफोड केली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली आणि २०-२५ जणांवर एफआयआर नोंदवला आहे. यामध्ये सहभागी असलेल्यांवर कारवाई केली जाईल. एकाची ओळख पटली आहे. कायदा व सुव्यवस्था आता नियंत्रणात आहे. श्रीलंका आणि ताजिकिस्तानमधील दोन विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,”