बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांचा मोठा भाऊ वीर चोप्रा यांचे निधन झाले आहे. करोनामुळे त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. वीर यांनी ‘मुन्ना भाई एमबीबीएस’, ‘ब्रोकन हॉर्सेज’, ‘लगे रहो मुन्ना भाई’ आणि ‘3 इडियट्स’ या चित्रपटांसाठी विधु यांच्यासोबत काम केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ई-टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, वीर चोप्रा यांचे ५ जुलै रोजी निधन झाले आहे. वीर हे मालदिवला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांना करोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर त्यांना मुंबईमधील एच. एन. रिलायन्स या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या २१ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. पण ५ जुलै रोजी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

वीर चोप्रा यांच्या पत्नीचे नाव नमिता नायक चोप्रा आहे. त्या एक साउंड डिझायनर आहेत. वीर चोप्रा यांच्या मुलाचे नाव अभय चोप्रा उर्फ विकी चोप्रा आहे. वीर यांनी ‘फरारी की सवारी’, ‘एकलव्य: द रॉयल गार्ड’, ‘परिणीता’, ‘मिशन कश्मीर’ आणि ‘करीब’ या चित्रपटांची निर्माती केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidhu vinod chopras brother vir chopra is no more avb
Show comments