पीटीआय, गुरुग्राम, पलवल

धार्मिक हिंसाचारामुळे स्थगित करण्यात आलेली विश्व हिंदू परिषदे (विहिंप)ची नूहमधील ‘ब्रज मंडल यात्रा’ २८ ऑगस्टपासून पुन्हा सुरू करण्याची घोषणा हिंदू संघटनांनी हरयाणात रविवारी आयोजित केलेल्या ‘महापंचायतीत’ करण्यात आली. राज्य पोलीस सक्षम नसल्याने नूह हिंसाचाराचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपविण्याची मागणीही पंचायतीने केली.

raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
The Origin of the Honeymoon Tradition
सफरनामा : मधु इथे अन्…
martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
The murder of a minor girl will be tried in a fast track court thane news
अल्पवयीन मुलीचे हत्याप्रकरण जलदगती न्यायालयात चालणार
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी

विश्व हिंदू परिषदेच्या ‘ब्रज मंडल यात्रे’वर ३१ जुलैला हल्ला झाल्यानंतर नूहमध्ये उसळलेल्या धार्मिक संघर्षांत दोन गृहरक्षकांसह सहा जण ठार झाले होते. त्यानंतर ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. ती पुन्हा काढण्याचा निर्णय हिंदू महापंचायतीने घेतला.

हिंदू संघटनांची ही महापंचायत पलवलमधील पोंदरी खेडय़ात झाली. ‘सर्व हिंदू समाज’च्या विद्यमाने झालेल्या या महापंचायतीत विश्व हिंदू परिषदेसह इतर हिंदू संघटनांनी भाग घेतला. या सर्वजातीय महापंचायतीत पलवल, गुरुग्राम आणि इतर आसपासच्या भागांमधील नागरिक सहभागी झाले होते. ‘ब्रज मंडल यात्रा’ यात्रा नूहमधील नल्लर येथून पुन्हा सुरू होईल आणि ती जिल्ह्यातील फिरोजपूर झिरका आणि सिंगार मंदिरांमार्गे जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.

नूह येथे असलेल्या केंद्रीय दलांच्या चार पलटणी कायमस्वरूपी तैनात केल्या जाव्यात, असे विहिंपचे गुरुग्राममधील नेते देवेंदर सिंह यांनी या महापंचायतीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना सांगितले.ही महापंचायत मुळात नूह जिल्ह्यातील किर खेडय़ात होणार होती, मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव तिला परवानगी नाकारण्यात आली. नंतर पलवलमध्ये परवानगी देण्यात आली, असे पलवलचे पोलीस उपअधीक्षक संदीप मोर यांनी सांगितले. पलवल आणि नूह हे शेजारी शेजारी असलेले जिल्हे आहेत.

मर्यादित प्रमाणात मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आली असून, कुणीही द्वेषयुक्त भाषण केल्यास कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

हरियाणा हिंसाचाराचा तपास ‘एनआयए’कडे देण्याची मागणी.

हिंदू महापंचायतीचे निर्णय

’राज्य पोलीस सक्षम नसल्याने नूह हिंसाचाराचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवावा.
’हिंसाचारामुळे अपूर्ण राहिलेली शोभा यात्रा १८ ऑगस्टला पुन्हा सुरू होईल आणि नियोजित ठिकाणी पोहोचेल.
’जर नूह आणि आसपासच्या परिसरातील हिंदूंनी बंदूक परवान्यासाठी अर्ज केल्यास त्यांना तो सहानूभूतीच्या आधारावर देण्यात यावा.
’हिंसाचारानंतर अटक करण्यात आलेल्या सर्व निरपराधांची लवकरात लवकर सुटका करण्यात यावी.
’नूहचे जिल्हा मुख्यालय बरखास्त करून ते लगतच्या जिल्ह्यांना जोडण्यात यावे.
’मृताच्या कुटुंबीयांना एक कोटी आणि जखमींना ५० लाखांची भरपाई द्यावी.

Story img Loader