मद्यसम्राट उद्योगपती विजय मल्या यांना जामीनदार राहिलेल्या एका गरीब शेतक ऱ्याचे बँक खाते गोठवण्यात आले आहे. या शेतक ऱ्याचे नाव मनमोहन सिंग असे असून तो ५४ वर्षे वयाचा आहे. मल्या यांनी कर्ज बुडवल्यामुळे या शेतक ऱ्याला असा फटका बसला आहे. मनमोहन सिंग हा शेतकरी खजुरिया नवीराम खेडय़ाचा रहिवासी असून हे ठिकाण बिलासनंदा पोलिस स्टेशनच्या हद्दीत येते. बँक ऑफ बडोदाच्या नांद शाखेने या शेतकऱ्याला दोन दिवसांपूर्वी त्याची दोन्ही खाती गोठवण्यात आल्याचा निरोप पाठवला आहे. दरम्यान, बँकेच्या शाखेचे व्यवस्थापक मांगे लाल यांनी सांगितले की, प्रादेशिक कार्यालयाकडून तातडीचे आदेश आले असून ही खाती पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. मल्या यांना जामीनदार राहिल्याने या शेतक ऱ्यास हा फटका बसला. बँक ऑफ बडोदाचे प्रादेशिक कार्यालय मुंबई येथे असून कार्यालयाच्या आदेशावरून बँकेचे व्यवस्थापक मांगे लाल यांनी मनमोहन सिंग यांची दोन खाती गोठवली आहेत; त्यात अनुक्रमे १२ हजार व ४ हजार रूपये होते. सिंग यांनी सांगितले की, मी मल्या यांना ओळखत नाही व त्यांच्या कंपनीशी माझा काही संबंध नाही. मल्या किंवा किंगफिशर तर सोडाच; मी मुंबई किंवा लखनौचा प्रवासही केलेला नाही. या शेतक ऱ्याने दोन वर्षांपूर्वी चार लाख रूपये कर्ज घेतले. त्यासाठी त्याने जमिनीची कागदपत्रे सादर केली होती.

Story img Loader