अनेक बँकांचे ९ हजार कोटींहून अधिक देणे असलेले उद्योगपती विजय मल्या यांना भारतात परत येण्यास भाग पाडणे हे ‘वाईट धोरण’ असल्याचे तंत्रज्ञानातील गुंतवणूकदार टी.व्ही. मोहनदास पै यांनी म्हटले आहे. या प्रकरणी परस्पर वाटाघाटींतून तोडगा काढावा असे त्यांचे मत आहे.

या प्रकरणात सरकार जे काही करत आहे, त्यासाठी त्यांची बाजू पुरेशी बळकट नाही. त्यामुळे मल्या यांना परत आणण्यासाठी बळजबरी करणे हे धोरण चुकीचे आहे, असे ‘इन्फोसिस’चे माजी मुख्य वित्त अधिकारी असलेले पै यांनी म्हटले आहे. मल्या यांनी बँकांना दिलेली हमी वठवून त्यांची मालमत्ता गोठवण्याचा आदेश कर्ज वसुली लवादाला  द्यायला लावणे हे अधिक योग्य राहील, असेही पै म्हणाले.

 

Story img Loader