१५ हून अधिक सार्वजनिक बँकांचे ९,००० कोटी रुपयांचे कर्ज थकविणारे व भारतातून पसार झालेले विजय मल्ल्या यांनी ट्विटरवरून माध्यमे माझी शिकार करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे.
दोनच दिवसांपूर्वी विजय मल्ल्या यांनी ट्वीट करत आपण कामानिमित्त परदेशात आल्याचे सांगितले होते. तसेच, त्यात त्यांनी मी पळपुटा नाही, असेही लिहिले होते.  त्यानंतर आज पुन्हा त्यांनी ट्विट केले असून म्हटले की, प्रसारमाध्यमे माझा पाठलाग करत आहेत. दुर्दैवाने, मला त्यांनी योग्य ठिकाणी शोधले नाही. मी माध्यमांशी बोलणार नाही. त्यामुळे माध्यमांनी त्यांचे प्रयत्न वाया घालवू नये.
मल्ल्या यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले असून, त्यांना 18 मार्चपूर्वी हजर राहण्यास सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा