विजय मल्ल्याला लंडन कोर्टाने ४ डिसेंबर पर्यंत जामीन मंजूर केला आहे. तसेच याप्रकरणाची पुढची सुनावणी ६ जुलैला होणार आहे. त्यामुळे लंडन कोर्टाकडून विजय मल्ल्याला काही अंशी दिलासाच मिळाला आहे. कोर्टाबाहेर आल्यावर विजय मल्ल्याला प्रश्न विचारण्यासाठी पत्रकारांनी गर्दी केली होती. त्यावेळी एका पत्रकाराने विजय मल्ल्याला चोर-चोर च्या घोषणाबाजीबाबत प्रश्न विचारला. ज्यानंतर विजय मल्ल्या पत्रकारावर चांगलाच चिडला. तुम्हाला काहीही माहिती नसेल तर प्रश्न विचारत जाऊ नका गप्प बसा असे विजय मल्ल्याने म्हटले आहे. तसेच कोर्टात हजेरी लावतानाच, मी कोणताही गुन्हा केलेला नाही, कोणाचीच फसवणूक केली नाही, असे म्हणत कर्जबुडव्या विजय मल्ल्याने आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळले होते. आता विजय मल्ल्याला ४ डिसेंबरपर्यंत जामीन मंजूर करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा