ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान ऋषी सुनुक हे प्रसिद्ध शेफ संजय रैना यांच्यासोबत दिसत आहेत. संजय रैना यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. ज्यामध्ये ऋषी सुनुक हे विजय मामा यांना आपल्या घरी बोलावताना दिसत आहेत. मात्र विजय मामा नेमके कोण? हा सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१५ सेकंदांचा हा व्हिडिओ बराच मजेशीर आहे. या व्हिडिओमध्ये सर्वात अगोदर संजय रैना आणि नंतर ऋषी सुनक बोलताना दिसतात. व्हिडिओच्या सुरुवातीला संजय रैना म्हणतात की, मामा माझ्यासोबत तुम्हाला हॅलो म्हणण्यासाठी कोणीतरी आहे आणि यानंतर ते कॅमेरा ऋषी सुनक यांच्याकडे वळवतात. पुढे ऋषी सुनक हे विजय मामांशी बोलताना दिसतात.

हेही वाचा : टाटा एअर बस प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा, म्हणाल्या…

या व्हिडिओमध्ये ऋषी सुनक म्हणतात की, ‘विजय मामा नमस्कार, मी ऋषी, तुम्ही कसे आहात?, अपेक्षा आहे की तुम्ही इथे याल आणि मला भेटाल. जेव्हा पण तुम्ही इथे याल तेव्हा संजयला डाउनिंग स्ट्रीट येथे नेण्यास सांगाल. माझं बोलणं लक्षात राहू द्या.’ तर या व्हिडिओसोबत संजय रैना यांनी गंमतीने ‘Visa on arrival ab pakka’ असंही लिहिलेलं आहे.

रैना यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला आहे. लोकांना आता प्रश्न पडला आहे की ऋषी सुनक यांचे विजय मामा नेमके कोण आहेत? ज्यांना सुनक यांनी आग्रहाने आपल्या घरी बोलावले आहे.

हेही वाचा : “आता आपल्या महाराष्ट्राच्या तरुणांनी काय करायचं? आरती करा, हनुमान चालीसा करा…”; छगन भुजबळांचं विधान!

ऋषी सुनक हे पत्नी अक्षता मूर्ती आणि दोन मुलीसह १० डाऊनिंग स्ट्रीटमधील छोटय़ा घरामध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ऋषी सुनक आपल्या कुटुंबासोबत या घरात राहण्यास जाणार असल्याचं त्यांच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे. त्या घरात जास्त आनंद मिळत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : गुजरातच्या हितासाठी देशात सध्या तीन सरकार कार्यरत आहेत – सचिन सावंतांनी लगावला टोला

टोनी ब्लेअर यांच्या काळापासून ब्रिटनचे पंतप्रधान शेजारच्या ११ डाऊनिंग स्ट्रीटमधील (अर्थमंत्र्यांचे कार्यालय) चार शयनगृहे असलेल्या घरात राहात होते. सुनक यांनी ही परंपरा मोडीत काढली आहे. सुनक स्वत: अर्थमंत्री असताना १० क्रमांकाच्या घरात राहत होते. आम्ही या घराची सजावट केली असून आमच्या कुटुंबासाठी ते पुरेसे आहे, असं सुनक यांनी जाहीर केलं आहे.

हेही वाचा : २६/११ चा हल्ला कोणीही विसरू शकणार नाही, तो दिवस सर्वांसाठी काळा दिवस होता – एकनाथ शिंदे

सुनक यांनी ऑगस्ट महिन्यात टाइम्स वृत्तपत्राशी बोलतानाही जर निवडून आलो तर आपण आधी राहत होतो त्या घरात पुन्हा वास्तव्यास जाऊ असं स्पष्ट केलं होतं. “आम्ही ते घर सजवलं असून, ते फार सुंदर आहे,” असं ते म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay mama rishi is speaking british prime minister rishi sunak phone call goes viral msr