Paytm Founder On Iphone 16 : पेटीएमचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आयफोन १६ च्या कॅमेरा क्वालिटीवर टीका केली होती. त्यांची पोस्ट आता पुन्हा व्हायरल होत आहे. एक्सवरील पोस्टमध्ये, विजय शेखर शर्मा यांनी आयफोनच्या कॅमेऱ्याबाबत निराशा व्यक्त केली आणि म्हटले की, कॅमेरा इतका वाईट आहे की, ते आता पिक्सलचा फोन करण्याचा विचार करत आहेत. यावेळी त्यांच्या पोस्टमध्ये शर्मांनी इतर आयफोन युजर्सना पण कॅमेऱ्याच्या अडचणी येत आहेत का, याबाबत विचारले आहे. दरम्यान शर्मा यांची ही पोस्ट आतापर्यंत चार लाख युजर्सनी वाचली आहे.

“मला आश्चर्य वाटते की, आयफोन १६ मध्ये इतका वाईट कॅमेरा कसा काय आहे? तो इतका वाईट आहे की, मी आता पिक्सेल फोन घेण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. इतरांनाही अशाच अडचणी येत आहेत का?”, असे विजय शेखर शर्मा त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहेत.

Monalisa Marathi News
Monalisa : मोनालिसाचा आरोप, “काही लोक फोटो काढण्यासाठी सक्तीने तंबूत आले आणि माझ्या भावाला…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Retired Soldier Kills Wife, Disposes of Body Parts in Hyderabad Lake
Crime News : याला माणूस तरी कसं म्हणावं? पत्नीची हत्या केली अन् मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले, निवृत्त जवानाचे क्रूर कृत्य
Elon Musk and Sam Altman in conflict over the $500 billion AI project announced by Donald Trump.
Donald Trump : “त्यांच्याकडे पैसेच नाहीत”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच मोठ्या घोषणेची Elon Musk यांनी उडवली खिल्ली
Donald Trump
Donald Trump : ट्रम्प यांची रशियाला धमकी! म्हणाले, “जर युक्रेनविरोधातील युद्ध थांबले नाही तर…”
Anant Ambani Vantara
Anant Ambanis Vantara : अमानुष छळ सहन केलेल्या २० हत्तींना अनंंत अंबानींमुळे मिळणार नवं आयुष्य! ‘वंतारा’त मिळवून दिली हक्काची सोय
Ajit Pawar avoided to sitting next to sharad pawar
Ajit Pawar : शरद पवारांच्या बाजूला बसणं का टाळलं? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “माझा आवाज…”
auto driver who helped saif ali khan says not able to work
सैफला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षा चालकाने व्यक्त केली नाराजी; म्हणाला, “मी घाबरलोय कारण…”

दिग्गजांच्या प्रतिक्रिया

दरम्यान विजय शेखर शर्मा यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली असून, सामन्य आयफोन युजर्ससह अनेक दिग्गजांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. विजय शेखर शर्मा यांच्या पोस्टला उत्तर देताना, गुगलचे माजी एक्झिक्युटिव्ह परमिंदर सिंग म्हणाले की, “मलाही हाच अनुभव आला आहे. कॅमेरा किंवा अॅपमध्ये काहीतरी गंभीर चूक आहे.”

एडलवाईस म्युच्युअल फंडच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राधिका गुप्ता यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या , “पिक्सेल खूप छान आहे! आयफोन सोडून मी आता पिक्सल वापरायला लागले आहे.”

युजर्स काय म्हणाले?

पुढे एका युजरने, “आयफोन ६ हा शेवटचा आयफोन होता ज्यामध्ये नावीन्य होते. नंतरचे आयफोन तांत्रिक वैशिष्ट्यांसह फक्त आकर्षक आहेत”, असे लिहिले. तर दुसरा एक युजर म्हणाला की, “हो, सर. मी सर्व पिक्सेल फोन वापरले आहेत. अलिकडेच आयफोन घेतला होता. पण, आता पुन्हा पिक्सेल घेण्यासाठी उत्सुक आहे. पिक्सेल ९ कॅमेराच्या बाबतीत सर्वोत्तम आहे. तुम्ही तो घेऊ शकता.”

Story img Loader