Vikas Divyakirti MCD Sealed Drishti IAS Classes : दिल्लीतल्या जुन्या राजेंद्र नगर येथील RAU’s आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पावसाचं पाणी शिरून यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थिनी व एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर दिल्ली महापालिका प्रशासन खडबडून जागं झालं आहे. महापालिकेने राजेंद्र नगर व मुखर्जी नगरसह दिल्लीतल्या अनेक ठिकाणी इमारतींची तळघरं, प्रामुख्याने ज्या इमारतींमध्ये कोचिंग सेंटर्स (शिकवणी वर्ग) चालवले जातात अशा इमारतींची तळघरं सील करण्यास सुरुवाती केली आहे. महापालिकेने सोमवारी (२९ जुलै) १३ कोचिंग इनस्टिट्युटची तळघरं सील केली. यामध्ये दृष्टी आयएएस इन्स्टिट्युट, वाजी राम आयएएस इन्स्टिट्युट, वाजीराम आणि रवी इन्स्टिट्युट, वाजीराम आणि आयएएस हब, श्रीराम आयएएस इन्स्टिट्युटसह इतर काही कोचिंग इन्स्टिट्युट्सचा समावेश आहे. या कोचिंग इनस्टिट्युटचे शिकवणी वर्ग वेगवेगळ्या इमारतींच्या तळघरात चालवले जात होते. ही तळघरं आता सील करण्यात आली आहेत.

यूपीएससीची शिकवणी घेणारे प्रसिद्ध शिक्षक विकास दिव्यकीर्ती (Vikas Divyakirti) यांच्या दृष्टी आयएएस या कोचिंग सेंटरवरही कारवाई करण्यात आली आहे. दिल्लीतल्या नेहरू विहारमधील वर्धमान मॉलच्या तळघरात दृष्टी आयएएसचे शिकवणी वर्ग चालवले जात होते. सुरक्षेच्या कारणास्तव हे तळघर आता सील करण्यात आलं आहे. दृष्टी आयएएस इनस्टिट्युटच्या एकूण पाच खोल्या सील करण्यात आल्या आहेत. तसेच ही इन्स्टिट्युट चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. दरम्यान, RUU’s आयएएस इन्स्टिट्युटमध्ये घडलेल्या घटनेवर विकास दिव्यकीर्तींसह इतर प्रसिद्ध आयएएस गुरूंनी मौन बाळगल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.

Makar Sankranti 2025 Funny video of a kid flying a kite with pants falls down viral video
याला म्हणतात नाद! पँट खाली आली पण पतंग नाही सोडली; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Pune Video young people of which district live most in pune
Pune Video : पुण्यात कोणत्या जिल्ह्यातील सर्वात जास्त तरुणमंडळी आहेत? नेटकऱ्यांनीच दिले उत्तर
emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…
बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Revenue Minister Chandrashekhar Bawankule warned revenue officials
खबरदार! कामात कुचराई तर कारवाई, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणाला दिला इशारा?
Action will be taken if forced to purchase fertilizer says Prakash Abitkar
खत खरेदीची सक्ती केल्यास कारवाई – प्रकाश आबिटकर
Kalyan-Dombivli, Kalyan-Dombivli drivers ,
कल्याण-डोंबिवलीत सुसाट दुचाकी चालविणाऱ्या चालकांवर कारवाई

कोण आहेत विकास दिव्यकीर्ती? (Who is Vikas Divyakirti)

दिल्लीमधील राजेंद्र नगर हा यूपीएससी कोचिंगचा गड मानला जातो. दर वर्षी देशाच्या वेगवेगळ्या भागातून तरुण-तरुणी यूपीएससीची तयारी करण्यासाठी राजेंद्र नगरमध्ये येतात. राजेंद्र नगरमध्ये यूपीएससीचा अभ्यास घेणाऱ्या शेकडो इन्स्टिट्युट आहेत. दृष्टी आयएएस इन्स्टिट्युट ही त्यापैकीच एक संस्था आहे. विकास दिव्यकीर्ती हे या संस्थेचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. दिव्यकीर्ती हे समाजमाध्यमांवरील लोकप्रिय शिक्षकांपैकी एक आहेत. देशभरात त्यांचे हजारो फॉलोवर्स आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विकास दिव्यकीर्ती हे नाव प्रचलित आहेत.

12th Fail चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका (Vikas Divyakirti in 12th Fail Movie)

काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 12th Fail या चित्रपटात विकास यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. हा चित्रपटही स्पर्धा परीक्षेशी संबंधित होता. विकास यांचा जन्म २६ डिसेंबर १९७३ रोजी हरियाणाच्या भिवानी येथे झाला होता. ते लहानपणापासून अभ्यासात हुशार होते. त्यांचे आई-वडील हिंदी साहित्याचे प्राध्यापक होते. त्यामुळे लहान वयापासूनच त्यांना हिंदी भाषा व साहित्याची गोडी लागली. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बीए, हिंदी साहित्यात एमए, एम फिल आणि पीएचडी मिळवली आहे. त्यांनी भारतीय विद्या भवन येथून ट्रान्सलेशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.

Drishti IAS Institute Sealed
विकास दिव्यकीर्ती यांच्या दृष्टी आयएएस इन्स्टीट्युटवर कारवाई (PC : ANI)

हे ही वाचा >> दिल्लीत कारवाईचा धडाका; ‘यूपीएससी’ विद्यार्थी मृत्युप्रकरणी पाच जणांना अटक

…अन् दिव्यकीर्तींनी दोन वर्षांत सरकारी नोकरी सोडली (Vikas Divyakirti starts IAS Coaching)

विकास दिव्यकीर्ती हे यूपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यांनी त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात एक शिक्षक म्हणून केली होती. सुरुवातीच्या काळात ते दिल्ली विद्यापीठात शिकवत होते. दरम्यान, ते यूपीएससीची तयारी देखील करत होते. १९९६ मध्ये ते पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते केंद्रीय गृह मंत्रालयात रुजू झाले. शासकीय नोकरी प्राप्त केल्यानंतरही त्यांनी अजून दोन वेळा ही परीक्षा दिली. मात्र दोन्ही वेळा ते अपयशी ठरले. त्यानंतर वर्षभराने १९९९ मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि दृष्टी आयएएस कोचिंग इन्स्टिट्युटची स्थापना केली. ते यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यांचे विद्यार्थ्यांना शिकवतानाचे अनेक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

Story img Loader