Vinay Hiremath Social Post: ‘आयुष्यत खूप पैसा कमवायचाय’ असं स्वप्न असल्याचं असंख्यजण सांगत असतात. आयुष्यात इतका पैसा कमवायचाय की कशाचीच ददात पडता कामा नये, असं कित्येकांचं स्वप्न असतं. अत्यंत मोजक्या व्यक्तींचंच हे स्वप्न पूर्ण होतं आणि त्यांना हवा तसा खूप पैसा मिळतो. पण हे खूप पैसा मिळवायचं स्वप्न पूर्ण झाल्यावर काय? एवढा पैसा मिळाल्यानंतर त्यांचं पुढे काय होतं? याचं एक उदाहरण अमेरिकेतील भारतीय वंशाचे उद्योगपती विनय हिरेमठ यांच्या रुपात समोर आलं आहे. अवघ्या ३३ व्या वर्षी आपली कंपनी तब्बल ९७५ मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास ८३०० कोटींना विकल्यानंतर आता आयुष्यात करायचं काय? असा प्रश्न विनय हिरेमठ यांना सतावू लागला आहे. त्यांनी X वर यासंदर्भात सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.

“पुन्हा पैसे कमावण्याची इच्छाच मेली आहे”

विनय हिरेमठ यांनी नुकतीच ते सहसंस्थापक असलेली Loom ही स्टार्टअप कंपनी अॅटलाशियन या कंपनीला विकली. यातून त्यांना हजारो कोटी रुपये मिळाले. पण आता त्यांच्यासमोर यक्षप्रश्न उभा राहिला आहे. “मी श्रीमंत आहे आणि मला आता माझ्या या आयुष्याचं काय करायचं हे कळत नाहीये. गेल्या वर्षभरात आयुष्यात अनेक उलथापालथी झाल्या. माझी कंपनी विकल्यानंतर आयुष्यात पुन्हा कधीच काम करण्याची गरज नसल्याच्या अवस्थेत मी येऊन पोहोचलो आहे. सगळंकाही निरस वाटू लागलं आहे. पुन्हा पैसे कमावण्याची किंवा स्टेटस मिळवण्याची इच्छाच मेली आहे. माझ्या पुढच्या आयुष्याबद्दल मी फारसा आशादायी नाहीये”, असं विनय हिरेमठ यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

HMPV infections
HMPV Virus India : HMPV विषाणूची लागण झालेल्या भारतातील रुग्णांबाबत केंद्राची महत्त्वाची माहिती, जारी केलं निवेदन
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
highest paid man in the world
तासाला दोन कोटी, तर वर्षाला १७ हजार कोटी; जगात सर्वाधिक पगार घेणारे जगदीप सिंग कोण आहेत?
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Rohit Roy recalls surprising daughter Kiara
अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”
Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor wedding
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकलेल्या अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! पत्नी सुध्दा आहे अभिनेत्री, ‘या’ लोकप्रिय मालिकेत केलंय काम
Torres scam
दागिने बनविणाऱ्या ‘टोरेस’च्या कार्यालयांबाहेर गर्दीमुळे तणाव; विदेशी कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक
Tiger Cubs Hunting Deer In Ranthambore Animal shocking Video
शेवटी रक्त वाघाचं आहे; वाघाच्या पिल्लानं केली भल्यामोठ्या हरणाची शिकार, VIDEO पाहून थक्क व्हाल

प्रेयसीशी फारकत, भावनिक पोस्ट

विनय हिरेमठ यांनी याच मानसिक अवस्थेत आपल्या प्रेयसीशीही फारकत घेतली. त्याच्या प्रचंड वेदना होत असल्याचं नमूद करतानाच त्यांनी पोस्टमध्ये प्रेयसीची माफीही मागितली आहे. “तिच्यापासून वेगळं होणं हा निर्णय योग्यच होता. पण ते सगळं फार वेदनादायी होतं. जर ती ही पोस्ट वाचत असेल, तर मी सगळ्यासाठी तिचे आभार मानेन. तुला जसा हवा होतो, तसा मी होऊ शकलो नाही यासाठी मला माफ कर”, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

रोबोटिक्स क्षेत्रात प्रयत्न केले, पण…

दरम्यान, विनय हिरेमठ यांनी कंपनी विकल्यानंतर रोबोटिक्स क्षेत्रात काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. किमान अनेक गुंतवणूकदार आणि रोबोटिक्स तज्ज्ञांना ते भेटले. पण त्यांच्याकडूनही हिरेमठ यांना निराशाच पदरी पडली.

सासर असावं तर असं! भारतीय मुलाशी लग्न करून बदललं आयुष्य, अमेरिकन महिला VIDEO शेअर करत म्हणाली…

आता फिजिक्सकडे मोर्चा…

दरम्यान, आता विनय हिरेमठ यांनी फिजिक्सकडे आपला मोर्चा वळवला आहे. सध्या ते फिजिक्स शिकत आहेत. खऱ्या आयुष्यातील गोष्टी बनवणारी एक कंपनी सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. ही कंपनी त्यांच्या आधीच्या Loom कंपनीइतकी यशाच्या शिखरापर्यंत गेली नाही, तरी त्यांची काहीच हरकत नाहीये!

Story img Loader