Mansukh Mandviya Statement on Vinesh Phogat: भारताची कुस्तीपटू विनेश फोगट कुस्तीच्या ५० किलो वजनी गटात अपात्र ठरल्यानंतर त्यावरून भारतीयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विनेश फोगटचं वजन ५० किलोंपेक्षा फक्त १०० ग्रॅम जास्त असल्यामुळे तिला अंतिम सामना खेळण्यापासून अपात्र ठरवण्यात आलं होतं. तसेच, त्या गटातूनच तिला अपात्र ठरवण्यात आल्यामुळे विनेश फोगटला आता कोणतंही पदक मिळू शकणार नाही. या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक असोसिएशनच्या निर्णयावर शंकादेखील उपस्थित केल्या जात आहेत. या सर्व प्रकरणावर भारत सरकारची नेमकी भूमिका काय? याबाबत केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी बुधवारी लोकसभेमध्ये सविस्तर निवेदन केलं. विनेश फोगटला जेजे हवं होतं ते सगळं पुरवण्यात आलं होतं, असं मनसुख मांडवीय यावेळी निवेदनात म्हणाले.

विनेश फोगट प्रकरणी भारत सरकारची भूमिका काय?

केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी लोकसभेत या प्रकरणावर केंद्र सरकारची भूमिका मांडली. “भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट वजन जास्त भरल्यामुळे ऑलिम्पिकच्या ५० किलो वजनी गटातून अपात्र झाली आहे. १०० ग्रॅम वजन जास्त झाल्यामुळे तिला अपात्र करण्यात आलं आहे. विनेश या गटात खेळत असल्यामुळे तिचं वजन ५० किलो किंवा त्यापेक्षा कमी असणं अपेक्षित होतं. पण ते जास्त भरल्यामुळए युनायटेड वर्ल्ड रेसलिंग अर्थात UWW च्या नियमांनुसार विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आलं आहे. तिथे दररोज सकाळी खेळाडूंच्या वजनाची मोजणी केली जाते”, असं मनसुख मांडवीय म्हणाल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.

Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
constitution of india credit loksatta
चतु:सूत्र : संविधाननिर्मितीचे श्रेय कोणाला?
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Rohit Sharma Statement on India Defeat in Pink Ball Test Said we didnt play well enough to win the game
IND vs AUS: भारताने पिंक बॉल कसोटी गमावण्यामागचं रोहित शर्माने सांगितलं कारण, कोणाच्या डोक्यावर फोडलं पराभवाचं खापर?

“७ ऑगस्ट २०२४ रोजी कुस्तीपटूंचं वजन मोजण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. यावेळी विनेश फोगटचं वजन ५० किलो १०० ग्रॅम भरलं. त्यामुळे विनेशला अंतिम सामना खेळण्यासाठी अपात्र घोषित करण्यात आलं”, असं मनसुख मांडवीय यांनी आपल्या निवेदनात नमूद केलं आहे.

“७ ऑगस्ट २०२४ ला ५० किलो वजनी गटातील वजनाची मोजणी ७ वाजून १५ मिनीट व ७ वाजून ३० मिनिटांनी करण्यात आली. विनेशचं वजन ५० किलो १०० ग्रॅम आलं. त्यामुळे तिला स्पर्धेसाठी अपात्र ठरवण्यात आलं. यासंदर्भात भारतीय ऑलिम्पिक संघानं आंतरराष्ट्रीय कुस्ती महसंघाकडे कठोर शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष पी. टी. उषाही पॅरीसमध्येच आहेत. पंतप्रधानांनी स्वत: त्यांच्याशी बोलून योग्य ती कारवाई करण्यास सांगितलं आहे”, असं मनसुख मांडवीय यावेळी लोकसभेत म्हणाले.

vijender singh on vinesh phogat disqualified
विजेंदर सिंगचं विनेश फोगट प्रकरणात मोठं विधान! (फोटो – रॉयटर्स)

“विनेश मंगळवारी ६ ऑगस्टला ३ सामने खेळून ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. सेमीफायनलमध्ये तिने क्युबाच्या कुस्तीपटूला पराभूत केलं होतं. विनेश फोगटला बुधवारी ७ ऑगस्टला रात्री १० च्या सुमारास सुवर्ण पदकासाठी अमेरिकेच्या कुस्तीपटूशी सामना करायचा होता”, अशी माहिती मांडवीय यांनी दिली.

विनेश फोगटवर केलेल्या खर्चाची यादी वाचून दाखवली

“विनेश फोगटच्या तयारीसाठीच्या मदतीचा मुद्दा घेतल्यास, भारत सरकारने विनेश फोगटला जे जे हवं होतं, ती सर्व मदत दिली आहे. विनेश फोगटला वैयक्तिक कर्मचारीही देण्यात आले आहेत. विनेशसोबत हंगेरीचे प्रसिद्ध प्रशिक्षक होलेर अपोस व फिजिओ अश्विनी पाटील नेहमी असतात. या कर्मचाऱ्यांसाठी विशेष आर्थिक तरतूदही करण्यात आली होती. पॅरिस ऑलिम्पिकसाठी विनेश फोगटच्या तयारीसाठी व सपोर्ट स्टाफसाठी ७० लाख ४५ हजार ७७५ रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे”, असं सांगत मनसुख मांडवीय यांनी सरकारनं केलेल्या खर्चाची यादी लोकसभेत वाचून दाखवली.

विनेशची ऐतिहासिक कामगिरी

विनेश फोगटनं ५० किलो वजनी गटात अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. ती ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरली होती. तिचं पदकही निश्चित झालं होतं. पण फक्त १०० ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आल्यामुळे तिचं सुवर्णपदकाचं स्वप्न धुळीस मिळालं आहे.

Vinesh Phogat Disqualification: “सरळ बॅगा उचला आणि…”, विनेश फोगटच्या अपात्रतेवर विजेंदर सिंग संतापला; म्हणाला, “१०० ग्रॅमसाठी…”

विजेंदर सिंगनं केला मोठा आरोप

दरम्यान, भारताचा ऑलिम्पिकपटू विजेंदर कुमारनं या प्रकरणात मोठं भाष्य केलं आहे. या सगळ्या प्रकारात भारताला पदक मिळू नये असा कट असू शकतो असं मला वाटतंय, असं विजेंदर म्हणाला आहे. “खेळात बऱ्याच तांत्रिक बाबी असतात ज्या सगळ्यांना माहिती नसतात. तिथे दोन वजन करण्याच्या मशीन असतात. आधी ट्रायल वेट होतं. तिथे तुमचं वजन नोंदवतात. नंतर अंतिम वजन करण्यासाठी खेळाडू जातात. १०० ग्रॅम वजन जास्त असेल तर त्या खेळाडूला एक संधी दिली जाते. त्याला सांगितलं जातं की तुम्ही ३० मिनीट घ्या. तुमचं पुन्हा वजन करू. त्यामुळे ही काही फार मोठी बाब नाही. पण त्या खेळाडूला अपात्र करणं हा खूप कठोर निर्णय आहे. हा असा निर्णय का घेतला गेला हे मला कळत नाही”, असं विजेंदर सिंग आयएएनएसला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाला आहे.

Story img Loader